नवी दिल्ली : सध्या प्रसिद्ध कंपनी Apple ने त्यांची नवीन iPhone सीरीज भारतात लाँच केली आहे. कंपनीने iPhone 17, iPhone Air, iPhone 17 Pro आणि 17 Pro Max हे लाँच केले आहे. कंपनीने भारतीय किंमती देखील जाहीर केल्या आहेत. या फोनची किंमत दोन लाख रुपयांपेक्षा जास्त असणार आहे.
iPhone 17 हा एक बेस मॉडेल असणार आहे. त्यामध्ये A19 चिपसेट असणार आहे. या प्रोसेसरच्या मदतीने तुम्हाला केवळ चांगले परफॉर्मन्स मिळणार नाही तर बॅटरी बॅकअप देखील वाढेल. आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली बेस मॉडेल असेल, असा कंपनीचा दावा आहे. iPhone 17 दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. भारतात 256GB बेस व्हेरिएंट आहे, ज्याची किंमत 82900 रुपये आहे. त्याच वेळी, 512GB ची किंमत 102900 रुपये असणार आहे. iPhone 17 हँडसेट पाच कलरमध्ये मिळणार आहे. त्यामध्ये ब्लॅक, व्हाईट, ब्लू यांसारख्या कलरमध्ये असेल.
कंपनीने प्री-ऑर्डर १२ सप्टेंबरपासून सुरू केली आहे. ज्याची पहिली विक्री १९ सप्टेंबरपासून सुरू होईल. आयफोन एअर हा सर्वात स्लीम फोनपैकी एक आहे. तो तीन व्हेरिंयटमध्ये लाँच करण्यात आला आहे. भारतात त्याची प्री-बुकिंग १२ सप्टेंबरपासून सुरू होईल आणि त्याची पहिली विक्री १९ सप्टेंबरपासून सुरू होईल.
दरम्यान, सुरुवातीच्या व्हेरियंटची किंमत १,१९,९०० रुपये आहे, जी २५६GB इंटरनल स्टोरेज देते. आयफोन एअरच्या ५१२GB व्हेरिएंटची किंमत १,३९,९०० रुपये आहे. त्याच वेळी, १TB व्हेरिएंटची किंमत १,५९,९०० रुपये आहे.


