Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

दीपिकाने मुलगी दुआचा पहिला वाढदिवस केला साजरा; स्वतः केक तयार केला अन्…

दीपिकाने मुलगी दुआचा पहिला वाढदिवस केला साजरा; स्वतः केक तयार केला अन्…

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण, दीपिकाने तिची मुलगी दुआचा पहिला वाढदिवस साजरा केला. याच वाढदिवसाचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. दीपिकाने तिच्या मुलीसाठी स्वतःच्या हातांनी केक तयार केला. याचे फोटो शेअर केल्याने तिच्या फॅन्सने तिच्यावर कमेंटचा वर्षाव केला.

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांची मुलगी दुआ एक वर्षाची झाली आहे. दुआचा वाढदिवसही मोठ्या उत्साहात करण्यात आला. दीपिकाने हा वाढदिवस खूप सुंदर पद्धतीने साजरा केला. दीपिकाने स्वत: चॉकलेट केक बनवला. दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांची मुलगी दुआ मंगळवारी एक वर्षाची झाली. त्यानंतर एक दिवसानंतर, दीपिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिच्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा एक गोंडस फोटो शेअर केला आहे. त्यात घरगुती चॉकलेट केक दिसत आहे.

दरम्यान, ही पोस्ट शेअर करताना दीपिकाने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘माझे प्रेम…माझ्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसासाठी केक बनवत आहे’. यासोबतच तिने बलून इमोजीज देखील टाकले आहेत. हा फोटो समोर येताच, कमेंट सेक्शनमध्ये स्टार्सपासून चाहत्यांपर्यंत प्रतिक्रिया येत आहेत. अभिनेत्री भूमी पेडणेकरने रेड हार्ट इमोजी बनवला आहे. यासोबतच युजर्सनी दीपिकाच्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!