नवी दिल्ली : सध्या अनेक स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत. त्यात प्रसिद्ध कंपनी iQOO ने भारतीय बाजारात आपला नवीन फ्लॅगशिप फोन लाँच केला आहे. कंपनीने भारतात iQOO 15 लाँच केला आहे, जो स्नॅपड्रॅगन 8 Elite Gen 5 प्रोसेसरसह येतो. भारतापूर्वी, कंपनीने हा फोन चीनमध्ये लाँच केला होता. हा फोन Android 16 वर आधारित OriginOS सह येतो.
या फोनमध्ये AMOLED डिस्प्ले आहे जो 144Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. याव्यतिरिक्त, कंपनीने 50MP मेन लेन्ससह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. iQOO 15 मध्ये 6.85-इंचाचा AMOLED डिस्प्ले असून, जो 144Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 8 Elite Gen 5 प्रोसेसरसह येईल. त्यात Q3 सुपरकॉम्प्युटिंग चिप देखील असेल. हा फोन LPDDR5x अल्ट्रा रॅम आणि UFS 4.1 स्टोरेजसह येतो.
तसेच स्मार्टफोनमध्ये 50MP मेन लेन्स, 50MP टेलिफोटो लेन्स आणि 50MP अल्ट्रा-वाइड-अँगल लेन्स असतील. फोनमध्ये 100X डिजिटल झूम असेल. यात 32MP सेल्फी कॅमेरा देखील असेल. स्मार्टफोनमध्ये 7000mAh ची दमदार बॅटरीही देण्यात आली आहे. ही बॅटरी 100W चार्जिंगला सपोर्ट करते. यात 40W वायरलेस चार्जिंग देखील आहे.
किंमत काय आहे?
iQOO 15 भारतात 12GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी 72999 च्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला होता. 16GB RAM + 512GB स्टोरेज व्हेरिएंट 79999 मध्ये लाँच करण्यात आला होता.


