Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

WhatsApp वर फक्त ‘हा’ शब्द करा टाईप; तुम्हाला पुन्हा येणार नाहीत प्रमोशनल मेसेज

WhatsApp वर फक्त ‘हा’ शब्द करा टाईप; तुम्हाला पुन्हा येणार नाहीत प्रमोशनल मेसेज

नवी दिल्ली : सध्या अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. त्यात WhatsApp चा वापर सर्वाधिक आहे. जगभरातील एक लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. कॉलिंगपासून ते टेक्स्टिंगपर्यंत अनेक फीचर्स या माध्यमातून मिळत आहेत. त्यातील काही फीचर्स अनेकदा नकोसे वाटतात. पण, आता तुम्हाला याच WhatsApp वर येणारे प्रमोशनल मेसेज बंद करता येऊ शकतील.

सध्या बरेच व्यावसायिक WhatsApp वापरतात. हे व्यावसायिक त्यांच्या ग्राहकांना मेसेज पाठवतात. हे मेसेज ऑफर्स, सेवा आणि सवलतींबद्दल असू शकतात. या वारंवार येणाऱ्या WhatsApp मेसेजेसमुळे बरेच लोक त्रास देतात. लोक WhatsApp चा वापर वैयक्तिक मेसेजिंग प्लॅटफॉर्म म्हणून करतात. WhatsApp वरील प्रमोशनल मेसेजेस लक्ष विचलित करतात. जर तुम्हाला WhatsApp वरील प्रमोशनल मेसेजेसचा त्रास होत असेल, तर तुम्ही ते सहजपणे दूर करू शकता.

तुम्हाला XYZ नावाच्या कंपनीकडून वारंवार WhatsApp मेसेजेस येत असतील तर हे मेसेजेस ऑटोमेटेड आहेत, म्हणजे ते तुम्हाला संगणकाद्वारे पाठवले जातात. तुम्ही हे ऑटोमेटेड मेसेजेस सहजपणे थांबवू शकता. त्यासाठी तुम्हाला त्या कंपनीच्या चॅटवर जाऊन मेसेजमध्ये STOP टाईप करावे लागेल. असे केल्याने ब्रॉडकास्ट मेसेज थांबतील.

काही चॅट्स यानंतरही थांबू शकत नाहीत. अशा परिस्थितीत, तुम्ही त्यांना ब्लॉक करू शकता. एकदा चॅट ब्लॉक झाल्यानंतर, तुम्हाला त्या चॅनेलकडून अपडेट्स मिळणार नाहीत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!