नवी दिल्ली : सध्या टेक्नॉलॉजी चांगलीच फास्ट झाली आहे. अनेक गोष्टी घरबसल्या करता येत आहे. त्यात स्मार्टफोनचा वापरही वाढताना दिसत आहे. पण, स्मार्टफोन वापरताना काही काळजी घेणे गरजेचे असते. त्यात स्क्रीन रेकॉर्ड हा ऑप्शन चांगला जरी असला तरी तुमच्या फोनची लपूनछपून रेकॉर्डिंग केली जाऊ शकते. मात्र, आता ते ओळखू शकता येणार आहे.
कोणीतरी तुमच्या फोनची स्क्रीन रेकॉर्ड करत आहे का ते तुम्ही सहजपणे शोधू शकता. हॅकर्स मालवेअर वापरून हे करू शकतात. त्यांना तुमच्या फोनवर काही परमिशन्स आवश्यक आहेत. या परमिशन्स मिळाल्यानंतर ते सहजपणे अॅप (मालवेअर) इन्स्टॉल करू शकतात. मात्र, नवीन फोनमध्ये उपलब्ध असलेल्या काही फीचर्सच्या मदतीने, स्क्रीन रेकॉर्डिंग होत आहे की नाही हे तुम्ही सहजपणे शोधू शकता. मायक्रोफोन आणि कॅमेरा चालू असताना ग्रीन सिग्नल दिसतो, त्याचप्रमाणे स्क्रीन रेकॉर्डिंग चालू असताना तुम्हाला एक चिन्ह दिसेल.
स्क्रीन रेकॉर्डिंग चालू असताना, अँड्रॉइड फोनवरील नोटिफिकेशन बारमध्ये कधीकधी लाल, नारिंगी किंवा पांढरा सिग्नल दिसतो. तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंग आयकॉन देखील दिसेल. हे आयकॉन कंसात कॅमेरा [📷] सारखे दिसते. जर तुम्हाला हे चिन्ह दिसले आणि ते तुमच्या फोनच्या स्क्रीनवर चमकत असेल, तर याचा अर्थ स्क्रीन रेकॉर्डिंग चालू आहे, असे समजू शकते.
असं ओळखा मालवेअर आहे की नाही?
तुमच्या फोनमध्ये मालवेअरची अनेक चिन्हे असू शकतात. तुमचा फोन जास्त गरम होत असेल किंवा बॅटरी लवकर संपत असेल किंवा डेटा वापर वाढेल आणि तुमच्या स्टोरेजमध्ये अचानक नवीन व्हिडिओ फाईल्स तयार होऊ लागतील. तर फोनमध्ये मालवेअर असल्याचे दिसून येऊ शकते.


