Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

आता इंटरनेटशिवायही WhatsApp वरून करता येणार व्हिडिओ कॉल; Google चं ‘हे’ फीचर ठरले फायद्याचे…

आता इंटरनेटशिवायही WhatsApp वरून करता येणार व्हिडिओ कॉल; Google चं ‘हे’ फीचर ठरले फायद्याचे…

नवी दिल्ली : प्रसिद्ध सर्च इंजिन गुगल आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर घेऊन येत आहे. त्यात अलीकडेच जागतिक बाजारात कंपनीने पिक्सेल 10 ची सीरीज लाँच केली. ज्यामध्ये एक अतिशय उपयुक्त आणि नवीन वैशिष्ट्य आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, ही जगातील पहिली स्मार्टफोन मालिका असेल जी कोणत्याही नेटवर्कशिवाय देखील व्हॉट्सअॅपद्वारे ऑडिओ-व्हिडिओ कॉल करता येऊ शकेल.

गुगल कंपनीची ही नवी सीरीज 28 ऑगस्टपासून विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. ऑडिओ-व्हिडिओ कॉल आता सॅटेलाईटच्या माध्यमातून केले जातील. गुगलने एक्सवर पोस्ट लिहिली आहे. यामध्ये पिक्सेल 10 सीरीजच्या युजर्सना लवकरच सॅटेलाईट कनेक्टिव्हिटीसह व्हॉट्सअॅपवर कॉल करता येणार आहे. हे फीचर आपत्कालीन परिस्थितीत खूप उपयुक्त ठरेल जिथे नेटवर्क किंवा वाय-फाय उपलब्ध नाही. या तंत्रज्ञानाद्वारे, युजर्स अंतराळात उपस्थित असलेल्या उपग्रहांचा वापर करून संपर्क करू शकतील.

गुगलच्या पोस्टमध्ये एक टीझर देखील दाखवण्यात आला आहे, जो सॅटेलाईट कनेक्टिव्हिटीसह ऑडिओ-व्हिडिओ कॉलची शक्यता दर्शवितो. हे फीचर केवळ उपग्रह सेवा प्रदान करणाऱ्या दूरसंचार ऑपरेटरच्या नेटवर्कवर काम करणार आहे. देशात अद्याप सॅटेलाईट सेवा सुरू झालेली नाही. त्यामुळे भारतातील युजर्सना या फीचरचा लाभ घेण्यासाठी आणखी काहीवेळ वाट पाहावी लागू शकते.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!