Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

UPI सेवा वापरताय? तर तुमच्यासाठी महत्त्वाचे; 1 ऑक्टोबरपासून UPI ​सेवां​मध्ये केला जाणार मोठा बदल

UPI सेवा वापरताय? तर तुमच्यासाठी महत्त्वाचे; 1 ऑक्टोबरपासून UPI ​सेवां​मध्ये केला जाणार मोठा बदल

नवी दिल्ली : सध्या ऑनलाईन व्यवहारांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यात UPI अर्थात युनिफाइड पेमेंट इंटरफेस वापरणाऱ्या कोट्यवधी युजर्ससाठी एक महत्त्वाचा बदल येणार आहे. ‘नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ (NPCI) ने 1 ऑक्टोबर 2025 पासून P2P (पीअर-टू-पीअर) ‘कलेक्ट रिक्वेस्ट’ फीचर पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

कंपनीने घेतलेल्या या निर्णयाचा उद्देश डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित करणे आणि वाढत्या ऑनलाईन फसवणुकीला आळा घालणे आहे. हे फीचर कोणत्याही युजर्सला दुसऱ्या UPI युजर्सला पैशाची रिक्वेस्ट पाठवण्याची परवानगी देते. समोरील व्यक्ती रिक्वेस्ट अॅक्सेप्ट करताच आणि त्याचा UPI पिन टाकताच रक्कम हस्तांतरित केली जाते. मात्र, याचा वाढता वापर पाहता स्कॅमर्सच्या निशाण्यावर गेले. फसवणूक करणाऱ्यांनी बनावट रिक्वेस्ट पाठवून लोकांना फसवण्यास सुरुवात केली, ज्यामुळे आर्थिक नुकसानीच्या अनेक घटना घडल्या.

दरम्यान, याबाबतचा निर्णय घेताना NPCI ने स्पष्ट केले की, ही बंदी फक्त P2P कलेक्ट रिक्वेस्टवर लागू होईल. एक ऑक्टोबरनंतरही व्यापारी या सुविधेचा वापर करू शकतील. व्यापाऱ्यांसाठी केवायसी नियम कडक करण्याची योजना आहे, जेणेकरून फसवणूक आणखी कमी करता येईल.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!