नवी दिल्ली : सध्या अनेक स्मार्टफोन लाँच केले जात आहेत. त्यात आता OnePlus ने नवा OnePlus १३ वर एक आकर्षक ऑफर आणली आहे. या फोनवर तुम्ही अनेक पैसे वाचवू शकता. गेल्या वर्षी लाँच झालेला हा फोन सध्या ७००० रुपयांपेक्षा जास्त डिस्काउंटवर मिळत आहे. कंपनीने गेल्या वर्षी OnePlus १३ हा ६९९९९ च्या सुरुवातीच्या किमतीत लाँच केला होता.
OnePlus १३ ची ही किंमत १२GB RAM + २५६GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी आहे. हा फोन सध्या Amazon वर ६३९९९ मध्ये लिस्टेड झाला आहे. याव्यतिरिक्त, तुम्हाला १५०० ची बँक डिस्काउंट देखील मिळू शकणार आहे. फ्लॅट डिस्काउंट आणि बँक ऑफर एकत्रित केल्याने फोनची किंमत ६२४९९ रुपयांपेक्षा कमी होते. म्हणजेच तुम्ही या फोनवर ७५०० वाचवू शकता. पण, इतका मोठा डिस्काउंट मिळत असतानाच कंपनी लवकरच OnePlus 15 लाँच करत आहे. यानंतर, तुम्हाला OnePlus 13 वर चांगली डील मिळणार आहे.
तुम्हाला सध्याच्या ऑफरपेक्षा चांगली डील मिळेल. OnePlus 15 लाँच झाल्यामुळे, OnePlus 13 ची किंमत कमी होईल. तुम्हाला बँक ऑफर्स आणि फ्लॅट डिस्काउंटसारखे पर्याय देखील मिळतील. कंपनीने चीनमध्ये OnePlus 15 सुमारे 50000 रुपयांमध्ये लाँच केला होता. भारतात, हा फोन सुमारे 70000 मध्ये लाँच केला जाऊ शकतो, अशी शक्यता आहे.


