नवी दिल्ली : सध्या Portronics ने त्यांचे नवीन ऑडिओ डिव्हाईस लाँच केले असून, जे शक्तिशाली फीचर्ससह मिळत आहेत. कंपनीने आयर्न बीट्स ५ प्राईम हा त्यांचा नवीन पार्टी स्पीकर लाँच केला आहे. तो २५० वॅटचा साउंड आउटपुट देतो. हे डिव्हाईस घरातील पार्टी, बाहेरील कार्यक्रम आणि म्युझिक प्लेबॅकसाठी बेस्ट असा ठरत आहे.
पार्टी स्पीकरमध्ये एलईडी लाईट्स आहेत जे म्युझिकमध्ये फायद्याचे राहू शकतात. यामध्ये हँडल आणि ग्लाइडिंग व्हील्ससह मिळत आहेत. ज्यामुळे ते ने-आण करणे सोपे होते. Portronics आयर्न बीट्स ५ प्राइम २५० वॅटचा साउंड आउटपुट आणि ८-इंच ड्युअल सबवूफरसह मिळत आहे. त्यात बास बूस्ट टेक्नॉलॉजी आहे. स्पीकर अगदी डीप, कमी-पिच साउंड देखील चांगला प्ले करू शकतो. या स्पीकरमध्ये वायरलेस कराओके माईकसह देखील येते. माईकमध्ये इको कंट्रोल आहे, जे आवाज सुधारू शकते. डिव्हाइस ८००० एमएएच बॅटरीसह येते. एकदा चार्ज केल्याने ६ तास बॅटरी लाइफ मिळते. स्पीकर ब्लूटूथ ५.३ सह येतो.
यात TWS मोड आहे. या फीचरचा वापर करून, तुम्ही आउटपुट वाढवण्यासाठी एकाच वेळी दोन युनिट कनेक्ट करू शकता. स्पीकरमध्ये USB, Aux-In आणि इतर कनेक्टिव्हिटी पर्याय उपलब्ध आहेत. कंपनीने Portronics आयर्न बीट्स ५ प्राइम १३९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच केले.


