आपण निरोगी राहावं असं सर्वांनाच वाटत असतं. त्यानुसार, प्रयत्नही केले जातात. त्यात तुमच्यापैकी काही लोकांना सकाळी उठल्याबरोबर लगेचच डोकं दुखत असेल तर याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या गोष्टीकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्ला दिला जातो. अशाप्रकारे डोकं दुखणे हे व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता असल्याचे दर्शवते.
वारंवार डोकेदुखी, मुंग्या येणे, बधीर होणे किंवा हातपायांमध्ये विचित्र काटे येणे ही व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. काही लोक या अशा समस्यांकडे दुर्लक्ष करतात. कारण, अशा समस्या किरकोळ असल्याचे त्यांना वाटते. मात्र, अशी लक्षणे जर लवकर ओळखली गेली तर त्या सहजपणे नियंत्रित केली जाऊ शकते. व्हिटॅमिन बी १२ आपल्या शरीरात निरोगी तांबड्या रक्तपेशींच्या निर्मितीमध्ये, नसांचे संरक्षण करण्यात आणि मेंदूचे योग्य कार्य राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.
जेव्हा बी १२ ची कमतरता असते तेव्हा तांबड्या रक्तपेशी योग्यरित्या तयार होऊ शकत नाहीत. याचा थेट परिणाम मेंदूला ऑक्सिजन पुरवठ्यावर होतो. यामुळे सतत डोकेदुखी, जडपणा किंवा मायग्रेनचा त्रास होतो. या प्रकारात बाल्कनीत गेल्यावर आणि मोकळ्या हवेत उभे राहिल्यास डोकेदुखी कमी होऊ शकते.


