नवी दिल्ली : सायबर गुन्हेगार आणि धोकादायक हॅकर्स लोकांना लक्ष्य करण्यासाठी विविध आयडिया वापरत आहेत. या आयडियांपैकी एक म्हणजे बनावट एसएमएस, ज्याला बरेच लोक बळी पडतात. बनावट आणि खरे संदेश अर्थात मेसेजमध्ये फरक ओळखण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) एक्स प्लॅटफॉर्मवर एक मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.
ट्रायने एका पोस्टमध्ये स्पष्ट केले की, सर्व संदेश खरे नसतात. कोणीही अधिकृत मजकूर संदेश लिहू शकतो. खरे संदेश ओळखण्यासाठी, काही प्रत्यय (वाक्यांच्या शेवटी ठेवलेले शब्द) वापरणे आवश्यक आहे. जर पी, -एस, -टी, किंवा -जी सारखे शब्द असलेल्या संदेशांचे हेडर वापरले गेले तर ते खरे आहेत. पी म्हणजे प्रमोशनल, एस म्हणजे सर्व्हिस, टी म्हणजे ट्रान्झॅक्शनल आणि जी म्हणजे गव्हर्नमेंट. सायबर गुन्हेगार लोकांना फसवण्यासाठी बनावट संदेश पाठवतात, “तुम्हाला बक्षीस मिळाले आहे”, “तुमचे कार्ड पाठवले गेले आहे,” “तुम्ही लॉटरी जिंकली आहे,” अशाप्रकारे मेसेज पाठवले जात आहेत.
आजच तुमचे केवायसी अपडेट करा, नाहीतर तुमचे खाते बंद होईल. तुम्ही १० लाखांची लॉटरी जिंकली. अशी भाषा बनावट एसएमएसचे फीचर आहे. एसएमएसमध्ये एक विचित्र लिंक असते जी तुम्हाला बनावट पोर्टलवर घेऊन जाईल. ते बँक तपशील, ओटीपी, पिन किंवा सीव्हीव्ही नंबर इत्यादी विचारेल. नंतर ते कॉल करतात, मेसेज करतात किंवा ग्राहकांना लिंकवर क्लिक करण्यास सांगतात. त्यामुळे या गोष्टींकडे लक्ष देेण्याची गरज आहे.


