नवी दिल्ली : सध्या एअरटेल, Vi, Reliance Jio यांसारख्या कंपन्यांकडून नेटवर्क सर्व्हिस दिली जात आहे. कंपन्यांकडून ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्याचा नेहमी प्रयत्न असतो. त्यात आता Reliance Jio ने सर्वात स्वस्तातील रिचार्ज प्लॅन आणला आहे. या प्लॅनच्या माध्यमातून केवळ 100 रुपयांत अनेक सुविधा मिळणार आहेत.
Reliance Jio च्या रिचार्ज प्लॅनच्या यादीत ९१ रुपयांचा नवा प्लॅन समाविष्ट झाला आहे. हा प्लॅन २८ दिवसांच्या वैधतेसह येतो. तो कॉलिंग, डेटा आणि एसएमएससारखे फायदे देतो. जिओच्या या प्लॅनमध्ये 3GB डेटा येतो. याचा संपूर्ण वैधता कालावधीसाठी तुम्हाला हा डेटा एकाच वेळी मिळणार नाही. त्याऐवजी, कंपनी दररोज १०० एमबी डेटा देते, अतिरिक्त २०० एमबी डेटा देत आहे. हा प्लॅन २८ दिवसांसाठी २.८ जीबी डेटा आणि २०० एमबी अतिरिक्त डेटा देते. ग्राहकांना संपूर्ण वैधता कालावधीसाठी अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि ५० एसएमएस देखील मिळत आहेत.
डेटा मर्यादा पूर्ण झाल्यानंतर, युजर्संना ६४ kb/ps वेगाने डेटा मिळेल. असे जरी असले तरी हा प्लॅन सर्व जिओ युजर्ससाठी उपलब्ध नाही. कंपनीने विशेषतः जिओफोन वापरकर्त्यांसाठी हा प्लॅन लाँच केला आहे. जर तुम्ही Jio Phone युजर असाल तरच तुम्ही या प्लॅनचा फायदा घेऊ शकता. हा प्लॅन नियमित जिओ युजर्ससाठी उपलब्ध नाही. नियमित जिओ युजर्संना इतर प्लॅन पाहावे लागणार आहे.


