नवी दिल्ली : प्रसिद्ध कंपनी Samsung ने अलीकडेच आपली फ्लॅगशिप Galaxy S26 सीरीज लाँच केली. Galaxy S26 Ultra जवळपास एक महिना वापरल्यानंतर त्याचा Review आता आला आहे. या फोनमध्ये अनेक बेस्ट असे फीचर्स देण्यात आले आहेत.
कमीत कमी बदल, पण उपयुक्त असा हा फोन आहे. हा फोन पहिल्यांदा हातात घेतल्यावर नवा असाच वाटतो. पण थोड्या वापरानंतर फरक स्पष्ट दिसू लागतो. फोन पूर्वीपेक्षा अधिक स्लीम आणि हलका आहे, आणि त्याच्या बॉर्डरना किंचित गोलाकार आकार दिला आहे, ज्यामुळे तो हातात धरण्यास अधिक आरामदायक वाटतो. मागील काही वर्षांतील डिझाइनने प्रभावित केले होते, पण हे डिझाइन विशेष असे दिसत नाही. जर तुम्हाला Galaxy S25 Edge आठवत असेल, तर त्याचे डिझाइन त्यापासून आल्याचे दिसत आहे.
याची बिल्ड क्वालिटी बेस्ट अशी आहे. मजबूत मेटल फ्रेम आणि ग्लासमुळे, हा फोन रोजच्या वापरासाठी चांगला आहे. तसेच तो पाणी आणि धुळीपासून संरक्षण देतो. मात्र, टायटॅनियम फ्रेम आता उपलब्ध नाही. या फोनचा डिस्प्ले खरोखरच अप्रतिम आहे. मोठी ६.९-इंचाची स्क्रीन, उत्कृष्ट ब्राइटनेस आणि अतिशय शार्प क्वालिटी असून, सूर्यप्रकाशातही सर्व काही स्पष्टपणे दिसते.


