Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

एकनाथ शिंदेंना धक्का! निवडणूक होताच शिवसेनेत गटबाजी उफाळली; अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर

एकनाथ शिंदेंना धक्का! निवडणूक होताच शिवसेनेत गटबाजी उफाळली; अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर

Eknath Shinde : धाराशिव जिल्ह्यात शिवसेनेतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. जिल्हा परिषद सभापती निवडीनंतर नाराजीचा सूर अधिक तीव्र झाला आहे.

शिवसेनेचे लोकसभा प्रमुख आनंद पाटील यांनी स्थानिक पदाधिकारी शिंदे यांच्या आदेशांचे पालन करत नसल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून इतरांना संधी दिली जात असल्याचा आरोप करत त्यांनी आणि त्यांच्या मातोश्रींनी पदाचा राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे.

आनंद पाटील आणि त्यांच्या मातोश्री या कानेगाव गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले आहेत. मात्र, सभापती पदाच्या निवडीत त्यांना संधी न मिळाल्याने त्यांची नाराजी उफाळून आली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीपासून हा तिसऱ्यांदा असा अंतर्गत वाद समोर आला आहे.

दरम्यान, धाराशिव जिल्हा परिषदेत महायुतीने सत्ता स्थापन केली असून सभापतीपदाच्या चार जागांपैकी दोन भाजप, एक शिवसेना (शिंदे गट) आणि एक राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली आहे. विविध खात्यांच्या सभापतीपदी अनुक्रमे सिद्धेश्वर कोरे, विश्वास कोकणे, भाऊसाहेब खरसडे आणि पूजा शिंदे यांची निवड झाली आहे.

सभापतीपदासाठी अनेक इच्छुक मैदानात होते, मात्र अंतिम निवडीत काहींची संधी हुकल्याने असंतोष वाढला आहे. आता हा वाद मिटवण्यासाठी एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात आणि नाराज नेत्यांची समजूत कशी काढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!