Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Rohini Khadase : ‘वैयक्तिक’ कारणांपासून सुरू झालेला ‘माज’ उतरला; रुपाली चाकणकरांवर रोहिणी खडसेंची बोचरी टीका

Rohini Khadase : ‘वैयक्तिक’ कारणांपासून सुरू झालेला ‘माज’ उतरला; रुपाली चाकणकरांवर रोहिणी खडसेंची बोचरी टीका

Rupali Chakankar resignation : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा रुपाली चाकणकर यांनी अखेर राजीनामा दिला आहे. या निर्णयानंतर राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले असून विरोधकांनी चाकणकर यांच्यावर जोरदार टीका सुरू केली आहे.

रुपाली चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र पाठवत राजीनामा सादर केला. खरात प्रकरणामुळे आधीच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून त्यांना दूर व्हावे लागले होते, त्यानंतर आता पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही त्याग करावा लागला आहे.

या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी चाकणकर यांच्यावर बोचऱ्या शब्दांत टीका केली. “’वैयक्तिक’ कारणांपासून सुरू झालेला ‘माज’ आता दोन ओळींच्या राजीनाम्यावर आला,” अशी टीका खडसे यांनी केली.

दरम्यान, अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनीही चाकणकर यांच्यावर निशाणा साधत, “हा राजीनामा दिला गेला नाही, तर घेतला गेला आहे,” असे म्हणत खरात प्रकरणात सखोल चौकशी होणार असल्याचा दावा केला. तसेच SIT वरील मर्यादा आता हटल्याचेही त्यांनी नमूद केले.

मात्र, रुपाली चाकणकर यांनी आपली भूमिका ठाम ठेवत या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. “खरातच्या आर्थिक व्यवहारांशी किंवा गैरकृत्यांशी माझा दूरान्वयेही संबंध नाही. तपासात सत्य बाहेर येईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

तपास पारदर्शक आणि निष्पक्ष व्हावा, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलिस महासंचालकांकडे केली असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच सुनेत्रा पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतरच आपण राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे चाकणकर यांनी स्पष्ट केले आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!