नवी दिल्ली : सध्या अनेक गॅजेट्स मार्केटमध्ये आणले जात आहेत. त्यात आता प्रसिद्ध कंपनी Samsung ने भारतात Galaxy Book 5 लाँच केला आहे. हा कंपनीचा नवीन एआय-सपोर्टेड लॅपटॉप असेल, जो इंटेल कोर अल्ट्रा ५ किंवा कोर अल्ट्रा ७ प्रोसेसरसह मिळत आहे. Galaxy Book 5 मध्ये १५.६ इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले असेल. या डिव्हाइसमध्ये ६१.२Wh बॅटरी देण्यात आली आहे.
कंपनी १६GB RAM आणि ३२GB RAM चा पर्याय देत आहे. याशिवाय, तुम्ही ५१२GB किंवा १ TB स्टोरेज निवडू शकता. तुम्ही हा लॅपटॉप एका चार्जवर १९ तासांपर्यंत वापरू शकता, असा या ब्रँडचा दावा आहे. कंपनीने ७७९९० रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत Samsung Galaxy Book 5 लाँच केला आहे. ही किंमत लॅपटॉपच्या बेस व्हेरिएंटसाठी आहे. तुम्ही हे गॅजेट चार प्रकारांमध्ये खरेदी करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला Intel Core Ultra 5 आणि Intel Core Ultra 7 चा पर्याय मिळेल.
तुम्ही हा लॅपटॉप सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइट, Samsung Exclusive Store आणि निवडक अधिकृत रिटेल स्टोअर्समधून खरेदी करू शकता. लाँच ऑफर अंतर्गत, या लॅपटॉपवर १०००० रुपयांचा कॅशबॅक आणि नो-कॉस्ट EMI पर्याय मिळेल.
स्पेसिफिकेशन्स काय?
Samsung Galaxy Book 5 मध्ये १५.६-इंचाचा फुल-एचडी AMOLED टचस्क्रीन आहे, जो अँटी-ग्लेअर कोटिंगसह येतो. हे डिव्हाइस Windows 11 Home वर काम करते. त्यात S Pen ला सपोर्ट आहे. लॅपटॉप Intel Core Ultra 7 प्रोसेसर, ३२GB RAM आणि १TB पर्यंत स्टोरेजसह खरेदी करता येतो.


