Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

सप्टेंबर महिना ठरेल ‘फुल टू धमाल’ ! ‘हे’ मोठे चित्रपट थिएटरमध्ये होतील प्रदर्शित

सप्टेंबर महिना ठरेल ‘फुल टू धमाल’ ! ‘हे’ मोठे चित्रपट थिएटरमध्ये होतील प्रदर्शित

मुंबई : ऑगस्ट महिना आता संपला आहे. त्यानंतर आता सप्टेंबर महिना धमाकेदार असणार आहे. कारण या महिन्यात अनेक चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहेत. ज्यामध्ये प्रेक्षकांना अॅक्शन, रोमान्स, कॉमेडी, थ्रिलर आणि ड्रामा पाहायला मिळणार आहे. केवळ हिंदीच नाही तर विविध भाषांमधील अनेक मोठे चित्रपट प्रदर्शित होतील.

जर तुम्हाला टायगर श्रॉफच्या अॅक्शनची आवड असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी असणार आहे. कारण, ‘बागी ४’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. ज्यामध्ये टायगर आणि संजयची जबरदस्त फाईट पाहायला मिळते. हा हिंदी चित्रपट ५ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

‘दिल मद्रासी’ या तमिळ चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर चाहत्यांचा उत्साह खूप वाढला आहे. हा चित्रपट श्री लक्ष्मी मुव्हीजच्या बॅनरखाली बनवण्यात आला आहे. अभिनेता शिवकार्तिकेय व्यतिरिक्त, यात रुक्मिणी वसंत आणि विद्युत जामवाल यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट ५ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

‘केडी द डेव्हिल’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचीही लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रसिद्ध दक्षिण चित्रपट अभिनेता ध्रुव सरजा यांच्या या चित्रपटात संजय दत्त, शिल्पा शेट्टी आणि नोरा फतेही सारख्या कलाकारांचा दमदार अभिनयही पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट ४ सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!