नवी दिल्ली : सध्या अनेक स्मार्टफोन लाँच केले जात आहेत. त्यात प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंगने काही महिन्यांपूर्वी भारतासह जागतिक बाजारपेठेत आपला सर्वात स्लीम हँडसेट लाँच केला होता. सुरुवातीला याची किंमत जास्त होती. मात्र, काही दिवसांतच या फोनची किंमत कमी करण्यात आली. Samsung Galaxy S25 असे या फोनचे नाव आहे.
Samsung Galaxy S25 Edge 5.8 मिमी जाड फोन आहे. या फोनमध्ये २०० मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा देण्यात आला. तर दुसरीकडे, Samsung Galaxy S25 ची जाडी ७.२ मिमी आहे. Samsung Galaxy S25 Edge 5G स्मार्टफोन विजय सेल्सवर ९३६४४ रुपयांना लिस्टेड झाला आहे. लाँचच्या वेळी बेस व्हेरिएंटची किंमत १०९९९९ रुपये होती. या किमतीत १2GB RAM आणि 256GB स्टोरेज असणार आहे. ही ऑफर मर्यादित काळासाठी असून, यामध्ये १६००० ची बचत होणार आहे. Samsung Galaxy S25 Edge मध्ये अनेक बेस्ट असे फीचर्स देण्यात आले आहेत.
Samsung Galaxy S25 Edge मध्ये ६.७-इंचाचा क्वाड HD+ डायनॅमिक AMOLED २X डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचा रिफ्रेश रेट १२०Hz आहे. कॉर्निंग गोरिल्ला ग्लास सिरेमिक २ स्क्रीन प्रोटेक्शनसाठी वापरला जातो. Samsung Galaxy S25 Edge मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यात २००MP फ्रंट कॅमेरा, १२MP सेकंडरी कॅमेरा आणि १२MP सेल्फी कॅमेराही दिला गेला आहे.


