पुणे : बँकेत नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, अहिल्यानगर येथील एका बँकेत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये रिक्त पदावर भरती केली जात आहे. यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
कोपरगाव पीपल्स को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, अहिल्यानगर येथे सहाय्यक महाव्यवस्थापक या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला कोपरगाव, अहिल्यानगर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एक रिक्त पद भरले जाणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही परीक्षा, मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी थेट बँकेशी संपर्क साधता येऊ शकणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : सहाय्यक महाव्यवस्थापक
– एकूण रिक्त पदे : 01 पदे.
– नोकरीचे ठिकाण : कोपरगाव, अहिल्यानगर.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल).
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 28 नोव्हेंबर 2025.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 डिसेंबर 2025
– अर्ज पाठवण्याचा ई–मेल आयडी : kpcbho@kpcb.bank.in


