नवी दिल्ली : सध्या 2G, 3G, 4G आणि नंतर जगाने 5G नेटवर्क अनुभवलं आहे. याचा वापर पूर्णपणे केला गेला नाही. असे असताना आता शास्त्रज्ञांनी 6G चिप लाँच केली आहे. यामुळे भविष्याची दिशा निश्चित होणार आहे. या तंत्रज्ञानामुळे इंटरनेट विजेपेक्षा वेगवान होणार असल्याचा दावा आता केला जात आहे.
या मिनी चिपच्या आगमनाने अल्ट्रा-हाय-स्पीड डेटा ट्रान्सफर शक्य होणार नाही तर नेटवर्कचा प्रतिसाद वेळ देखील मोठ्या प्रमाणात कमी होईल. याचा अर्थ रिअल-टाईम कम्युनिकेशन आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंस इंटिग्रेशन आणखी सोपे होईल. 6G चिपची चाचणी घेतली जात आहे. ही 6G चिप आकाराने खिळ्यापेक्षा लहान आहे. मात्र, त्याची क्षमता आश्चर्यकारक असणार आहे. ती 0.5 GHz ते 115 GHz च्या फ्रिक्वेन्सी रेंजला सपोर्ट करते.
साधारणपणे, एवढा मोठा स्पेक्ट्रम हाताळण्यासाठी नऊ वेगवेगळ्या रेडिओ सिस्टीमची आवश्यकता असणार आहे. मात्र, या चिपने एकाच प्लॅटफॉर्मवर सर्वकाही एकत्र आणले आहे. हे तंत्रज्ञान तयार करण्यासाठी थिन-फिल्म लिथियम निओबेट (TFLN) नावाच्या एका विशेष मटेरियलचा वापर करण्यात आला आहे.
यामध्ये, ब्रॉडबँड इलेक्ट्रो-ऑप्टिक मॉड्युलेटर वायरलेस सिग्नलला ऑप्टिकल सिग्नलमध्ये रूपांतरित करतो आणि नंतर ऑप्टो-इलेक्ट्रॉनिक ऑसिलेटर त्यांना आवश्यक रेडिओ फ्रिक्वेन्सीमध्ये रूपांतरित करतात. याने स्पीडही चांगला मिळणार आहे.


