Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

परवानगीशिवाय फोटो शेअर करणाऱ्यांना आता होईल त्रास; ‘या’ टेक्नॉलॉजीच्या साहाय्याने आक्षेपार्ह फोटो करता येईल ब्लॉक

परवानगीशिवाय फोटो शेअर करणाऱ्यांना आता होईल त्रास; ‘या’ टेक्नॉलॉजीच्या साहाय्याने आक्षेपार्ह फोटो करता येईल ब्लॉक

नवी दिल्ली : वाढत्या सायबर गुन्हेगारीला आणि संमतीशिवाय खाजगी फोटोंच्या (NCII) गैरवापरावर कडक पावले उचलली जात आहे. तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. सरकारच्या पाठिंब्याने चालवलेल्या जनजागृती मोहिमांअंतर्गत, आता कोणीही आपली ओळख उघड न करता किंवा फोटो अपलोड न करता आपले खाजगी फोटो इंटरनेटवरून काढून टाकू शकतो.

डिजिटल सुरक्षा मजबूत करण्यासाठी सरकारने (I4C, MHA) नवीन माहिती दिली आहे. StopNCII.org च्या माध्यमातून, पीडित व्यक्ती त्यांचे मॉर्फ केलेले किंवा लीक झालेले फोटो डिजिटल हॅशमध्ये रूपांतरित करून त्यांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ब्लॉक करू शकतात. ही प्रक्रिया पूर्णपणे गोपनीय आहे आणि यासाठी मूळ फोटो कुठेही अपलोड करण्याची आवश्यकता नाही.

सायबर गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र (I4C) नागरिकांना सुरक्षित राहण्याच्या मार्गांबद्दल सतत सल्ला देत आहे. सार्वजनिक बदनामीच्या भीतीमुळे किंवा गोपनीयतेच्या चिंतेमुळे कोणताही पीडित तक्रार दाखल करण्यास कचरू नये, हे सुनिश्चित करणे सरकारचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे, फोटो शेअर न करता ब्लॉक करण्याची परवानगी देणाऱ्या तंत्रज्ञानाला प्रोत्साहन दिले जात आहे.

डिजिटल फिंगरप्रिंट टेक्नॉलॉजी

ही प्रणाली फोटो स्कॅन करते आणि एक कोड (हॅश) तयार करते. हा कोड एक प्रकारचा डिजिटल फिंगरप्रिंट आहे. जेव्हा हा कोड फेसबुक, इन्स्टाग्राम किंवा इतर भागीदार साइट्सवर पाठवला जातो, तेव्हा त्यांचे अल्गोरिदम फोटो ओळखतात. भविष्यात कोणीही तो फोटो पुन्हा अपलोड करू शकणार नाही.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!