Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

जगातील सर्वात स्लिम फोन लवकरच होणार लाँच; 8000 mAh ची दमदार बॅटरी मिळणार, 5G तर आहेच शिवाय…

जगातील सर्वात स्लिम फोन लवकरच होणार लाँच; 8000 mAh ची दमदार बॅटरी मिळणार, 5G तर आहेच शिवाय…

नवी दिल्ली : सध्या स्मार्ट वॉच, स्मार्टफोन यांसारख्या गॅजेट्सना चांगली मागणी आहे. त्यात Apple iPhone एअरपासून ते सॅमसंग गॅलेक्सी S25 एज पर्यंत स्मार्टफोनमध्ये स्लिम बॉडीज आहेत. मात्र, अलीकडील स्मार्टफोन्समध्ये मर्यादित बॅटरी लाईफ दिली जात आहे. आता, टेकनो एक स्मार्टफोन लाँच करत आहे जो ८००० एमएएच बॅटरी आणि वक्र डिस्प्ले असलेला सर्वात बारीक फोन असेल. त्याला TECNO POVA CURVE 2 5G असे म्हटले जाईल.

कंपनीने १२ फेब्रुवारी रोजी भारतात एक नवीन स्मार्टफोन लाँच करण्याची घोषणा केली आहे, जो ८०००mAH बॅटरी, कर्व्ड डिस्प्ले आणि अतिशय स्लिम बॉडी असलेला जगातील पहिला फोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे. हँडसेटची जाडी ७.४२ मिमी आहे. हा स्मार्टफोन एकदा चार्ज केल्यानंतर दोन दिवस चालेल. टेकनो पोवा कर्व २ ५जी मध्ये ८००० एमएएच बॅटरी असेल. ही बॅटरी एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर २ दिवसांचा बॅटरी बॅकअप देईल असा दावा केला जात आहे. TECNO POVA Curve 2 5G मध्ये कर्व्हड AMOLED डिस्प्ले असेल. हा डिस्प्ले जाडी कमी करण्यास मदत करतो. डिस्प्लेच्या आकाराबाबत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.

TECNO POVA Curve 2 5G हा फोन मोठ्या बॅटरी पॅक असूनही, TECNO POVA Curve 2 5G ची जाडी 7.42mm आहे. डिव्हाइसचे वजन 195 ग्रॅम आहे. TECNO POVA Curve 2 5G च्या रंग प्रकारांबद्दल बोलायचे झाले तर, ते तीन पर्यायांमध्ये उपलब्ध असेल डीप ब्लॅक आणि मेटॅलिक सिल्व्हर. अधिकृत लाँचनंतर किंमत आणि इतर वैशिष्ट्ये उघड केली जातील.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!