Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

सोने-चांदीच्या दरात घसरण; चांदी आता 1.63 लाख स्वस्त; तर सोन्याचे दर…

सोने-चांदीच्या दरात घसरण; चांदी आता 1.63 लाख स्वस्त; तर सोन्याचे दर…

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सलग घसरणीनंतर सोने आणि चांदीच्या किमतीत तेजी येत होती. मात्र, आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी, ते पुन्हा घसरताना दिसून आले. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) उघडताना चांदीच्या किमती प्रति किलोग्रॅम ५५०० पेक्षा जास्त घसरल्या, तर सोन्याच्या किमतीही प्रति १० ग्रॅम २००० ने घसरल्याचे पाहिला मिळाले. सोने आणि चांदी हे दोन्ही उच्चांकावरून लक्षणीयरीत्या स्वस्त झाल्या आहेत. चांदीच्या फ्युचर्सच्या किमती १.६३ लाखांनी घसरल्या आहेत.

२९ जानेवारी रोजी, चांदीच्या किमती पहिल्यांदाच ऐतिहासिक ४ लाखांच्या पातळीवर पोहोचल्या आणि ४२००४८ या आयुष्यातील उच्चांकावर पोहोचल्या. या पातळीवर पोहोचल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी याच्या किमतीत घसरण पाहिला मिळाली. परंतु गेल्या काही दिवसांत तो ग्रीन झोनमध्येही दिसून आला आहे.

कमोडिटी मार्केट ट्रेडिंगनुसार, चांदीच्या किमती त्यांच्या मागील बंदपेक्षा झपाट्याने घसरल्या. सोमवारी, तो MCX वर २६२६२० प्रति किलोवर बंद झाला आणि मंगळवारी तो उघडला, तो घसरून २५६८६४ वर पोहोचला. परिणामी, ५ मार्च रोजी एक्सपायरी डेट असलेल्या १ किलो चांदीच्या किमतीत एकाच दिवसात ५७५६ ने घट झाली. आता हा दर त्याच्या उच्चांकावरून १६३१८४ ने घसरला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!