नवी दिल्ली : सध्या अनेक स्मार्टफोन आणले जात आहेत. त्यात प्रसिद्ध कंपनी Xiaomi ने भारतात Redmi 15A 5G हा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. यामध्ये 6300mAh बॅटरी, 32MP कॅमेरा आणि 120Hz डिस्प्ले देण्यात आला आहे. यात रिव्हर्स वायर्ड चार्जिंगची सुविधा देखील आहे, ज्यामुळे इतर हँडसेट चार्ज करता येतात.
Redmi 15A 5G तीन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे, ज्याची किंमत 4GB + 64GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी 12999 पासून सुरू होते. इतर व्हेरिएंट, 4GB + 128GB आणि 6GB + 128GB, यांची किंमत अनुक्रमे 13499 आणि 16499 आहे. Redmi 15A 5G स्मार्टफोन अँड्रॉइड 16-आधारित Xiaomi HyperOS 3.0 वर चालतो. कंपनीने याला 4 वर्षांचे अँड्रॉइड मेजर अपडेट्स आणि 6 वर्षांचे सुरक्षा अपडेट्स मिळतील. Redmi 15A 5G मध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. यात 6300mAh बॅटरी आणि 15W फास्ट चार्जर आहे, जो बॉक्समध्ये मिळतो. हे रिव्हर्स चार्जिंगला सपोर्ट करते.
Redmi 15A 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 660 nits ब्राइटनेस असलेला 6.9-इंचाचा HD+ डिस्प्ले आहे. या Redmi फोनमध्ये ऑक्टा-कोर Unisoc T8300 6nm चिपसेट आणि Mali G57 MC2 GPU वापरण्यात आला आहे. यात दोन रॅम आणि स्टोरेजचे पर्याय उपलब्ध आहेत, तसेच 1TB पर्यंतचे मायक्रोएसडी कार्ड वापरता येते.
Redmi 15A 5G चा कॅमेरा सेटअप
Redmi 15A 5G मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असून, यात 32MP चा प्रायमरी कॅमेरा आहे. यात 8MP चा कॅमेरा आणि 3.5mm ऑडिओ जॅक आहे.


