पुणे : सह्याद्री व्याघ्र प्रकल्प फाऊंडेशन, सातारा येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर तुम्हाला याठिकाणी नोकरीची संधी मिळू शकणार आहे. विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही माध्यमातून अर्ज करता येणार आहे.
जर तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑफलाईन आणि ऑनलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प फाऊंडेशन येथे पशुवैद्यकीय तांत्रिक सल्लागार अधिकारी (अर्धवेळ), स्थापत्य अभियंता, निसर्ग संवादक तज्ञ, भौगोलिक माहितीप्रणाली तज्ञ, संगणक मदतनीस यांसह इतर अनेक पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला सातारा येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 9 रिक्त पदे भरली जाणार आहेत.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : पशुवैद्यकीय तांत्रिक सल्लागार अधिकारी (अर्धवेळ), स्थापत्य अभियंता, निसर्ग संवादक तज्ञ, भौगोलिक माहितीप्रणाली तज्ञ, संगणक मदतनीस
– रिक्त पदे : 09 पदे.
– नोकरीचे ठिकाण : सातारा.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०७ एप्रिल २०२६.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : उपसंचालक (कोयना), सह्याद्री व्याघ्र राखीव, कराड यांचे कार्यालय “सह्याद्रीभवन”, त्रिमुर्ती कॉलनी, आगाशिवनगर पो. मलकापुर, ता. कराड, जि. सातारा ४१५५३९.
– ई- मेल : executivedirectortcfstr@gmail.com
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://mahaforest.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


