Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Nashik Election: महायुतीत ‘दोस्ती’ पण नाशिकमध्ये ‘कुस्ती’! भुजबळांचे खंदे समर्थक आता शिंदेंच्या गोटात

Nashik Election: महायुतीत ‘दोस्ती’ पण नाशिकमध्ये ‘कुस्ती’! भुजबळांचे खंदे समर्थक आता शिंदेंच्या गोटात

Nashik Election: राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून, नाशिकमध्ये राजकीय समीकरणे वेगाने बदलू लागली आहेत. छगन भुजबळ यांचे अत्यंत विश्वासू आणि कट्टर समर्थक मानले जाणारे कैलास मुदलियार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार गट) साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पक्षांतरामुळे नाशिकच्या राजकारणात खळबळ उडाली असून, भुजबळांच्या वर्चस्वाला सुरुंग लागल्याची चर्चा रंगली आहे.

नेमका पेच काय?

नाशिकमध्ये सुहास कांदे (शिंदे गट) आणि छगन भुजबळ (अजित पवार गट) यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. महायुतीत एकत्र असूनही या दोन्ही नेत्यांमधील वाद कमी होत नाहीत. अशातच भुजबळांच्या जवळच्या सहकाऱ्याला आपल्या गोटात खेचून शिंदे सेनेने भुजबळांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. नाशिकमधील शिवसेनेच्या कार्यालयात मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत मुदलियार यांचा जाहीर प्रवेश झाला. कैलास मुदलियार हे नाशिक मनपाच्या प्रभाग क्रमांक 20 मधून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – BMC Election 2026: मुंबईचा ‘किंग’ कोण? बीएमसी निवडणुकीचा पहिला सर्व्हे समोर; ठाकरे बंधूंच्या युतीमुळे महायुतीचं टेन्शन वाढणार?

भाजपची ‘वेट अँड वॉच’ची भूमिका

शिंदे गट आणि राष्ट्रवादीतील या वादाचा फायदा घेत नाशिकमध्ये भारतीय जनता पक्ष (BJP) स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या हालचाली करत असल्याची माहिती समोर येत आहे. महायुतीच्या जागावाटपाची चर्चा सुरू असतानाच, मित्रपक्षांमधील या ‘इनकमिंग’ आणि ‘आऊटगोइंग’मुळे मित्रपक्षांमध्ये अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. महापालिका निवडणुकीत नाशिकमध्ये कोणाचा वरचष्मा राहणार? आणि भुजबळ आपल्या समर्थकाच्या जाण्याने झालेले नुकसान कसे भरून काढणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!