Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

त्या बेशुद्ध पडल्या…पण सर्वजण फक्त व्हिडिओ काढत बसले; मुंबईतील महिला वकिलाचा कोर्टात मृत्यू

त्या बेशुद्ध पडल्या…पण सर्वजण फक्त व्हिडिओ काढत बसले; मुंबईतील महिला वकिलाचा कोर्टात मृत्यू

मुंबई: राज्याच्या राजधानीत गुरुवारी एक धक्कादायक घटना घडली. सुमारे 30 वर्षांचा वकिलीचा प्रदीर्घ प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ महिला वकिल मालती पवार (वय 59) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने कोर्टाच्या बाररूममध्येच निधन झाले. अचानक घडलेल्या या घटनेने संपूर्ण न्यायालय परिसराला शोककळा पसरली असून, वकिलांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. मालती पवार या ठाण्यातील माजिवडा परिसरात राहत होत्या आणि मुंबईतील विविध न्यायालयांमध्ये, तसेच फॅमिली कोर्ट आणि हायकोर्टात वकिली करत होत्या. गुरुवारी त्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातील कोर्टात एका प्रकरणाची प्रमाणित प्रत घेण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांनी आपल्या पती रमेश पवार यांना फोन करून सांगितले, माझी तब्येत ठीक नाही, मी थोडा वेळ बसते. काही मिनिटांतच त्यांची प्रकृती गंभीर झाली आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला. बाररूममध्ये उपस्थित असलेल्या लोकांनी प्रथमोपचार करण्याचा प्रयत्न केला, मात्र वेळेवर योग्य वैद्यकीय मदत न मिळाल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली.

मदतीचा हात वेळेत पुढे आला नाही; पतींचा आरोप

रमेश पवार यांनी गंभीर आरोप करत सांगितले की, “कोर्टात माझ्या पत्नीला हृदयविकाराचा झटका आला तेव्हा कोणीही तात्काळ सीपीआर दिला नाही. काही लोक व्हिडिओ काढत होते, तर काहींनी फक्त पाणी देण्याचा प्रयत्न केला. जीटी हॉस्पिटल अगदी जवळ असतानाही तिला लगेच तिकडे नेलं गेलं नाही. नंतर आझाद मैदान पोलिसांनी मालती पवार यांना कामा रुग्णालयात नेलं, पण डॉक्टरांनी त्यांना मृत झाल्याचं घोषित केलं. जेव्हा मी रुग्णालयात पोहोचलो, तेव्हा ती स्ट्रेचरवर पडलेली होती आणि तिच्याजवळ एकही सहकारी नव्हता, अशी वेदनादायी प्रतिक्रिया रमेश पवार यांनी दिली.

न्यायालयातील सुविधांचा गंभीर प्रश्न

या घटनेनंतर वकिल संघटनांकडून कोर्टातील आरोग्यविषयक सुविधांवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. कोर्टात प्राथमिक उपचार सुविधा, ऑक्सिजन सिलिंडर आणि प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळेच ही दुर्घटना घडली, असा आरोप सहकाऱ्यांनी केला आहे. मालती पवार यांचा मृत्यू ही केवळ एक दुर्दैवी घटना नसून, न्यायालयातील मूलभूत सुविधांबाबतचा इशारा असल्याचं वरिष्ठ वकिलांनी म्हटलं आहे. तातडीने उपचार मिळाले असते तर त्यांचा जीव वाचू शकला असता. आता तरी कोर्टात फर्स्ट एड आणि डॉक्टरांची व्यवस्था करावी, अशी मागणी वकिलांमधून होत आहे. या घटनेमुळे संपूर्ण न्यायालयीन वर्तुळात हळहळ व्यक्त होत असून, अनुभवी, संयमी आणि शांत स्वभावाच्या मालती पवार यांचा अकस्मात मृत्यू वकिली समाजासाठी मोठी पोकळी निर्माण करून गेला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!