Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

संगीतविश्वात शोककळा..! सुप्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचे निधन

संगीतविश्वात शोककळा..! सुप्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचे निधन

Sulakshana Pandit Death : बॉलिवूडसाठी आणि संगीतप्रेमींसाठी दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचे वयाच्या ७१व्या वर्षी मुंबईत निधन झाले आहे. नानावटी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही वर्षांपासून त्या गंभीर आजाराने त्रस्त होत्या आणि तब्बल १६ वर्षांपासून अंथरुणाला खिळून होत्या. त्यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

१९५४ साली जन्मलेल्या सुलक्षणा पंडित या एक प्रतिष्ठित संगीतकार कुटुंबातील होत्या. प्रख्यात शास्त्रीय गायक पंडित जसराज त्यांच्या काकांपैकी होते, तर त्यांचे भाऊ जतिन–ललित यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध संगीतकार जोडी म्हणून नाव कमावले. सुलक्षणा पंडित यांनी केवळ गायिका म्हणून नव्हे तर अभिनेत्री म्हणूनही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.

‘संकल्प’ (१९७५) चित्रपटातील ‘तू ही सागर है तू ही किनारा’ या गाण्यासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. अभिनयातही त्यांनी “उलझन” (१९७५) आणि “संकोच” (१९७६) यांसारख्या चित्रपटांत लक्षवेधी भूमिका साकारल्या. त्यांचे वैयक्तिक आयुष्य मात्र दुःखद ठरले. अभिनेता संजीव कुमार यांच्यासोबतच्या अपूर्ण प्रेमकथेने आणि त्यानंतरच्या एकाकीपणाने त्यांच्या जीवनावर खोल परिणाम झाला. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी आजार आणि आर्थिक अडचणींशी सामना केला.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!