Dhananjay Munde’s On Manoj Jarange: मराठा आरक्षण लढ्यातील सक्रिय नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांच्यावर धक्कादायक आरोप केले. जरांगे यांनी दावा केला की, मुंडेंनी त्यांच्या हत्येसंबंधी सुपारी दिली होती. या कामासाठी अडीच कोटींची वाटाघाट झाल्याचा दावाही त्यांनी केला. या धक्कादायक घोषणेनंतर राजकीय वर्तुळात तणाव वाढला आहे. तथापी, आता धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोपांचा स्पष्ट निषेध केला.
जरांगेंच्या आरोपावर धनंजय मुंडे काय म्हणाले ?
धनंजय मुंडे यांनी सांगितलं की, मी तीन दशकेहून अधिक काळ जनसेवा व सार्वजनिक कामात आहेत. परंतु, कधीही जातीभेदाने काम केलेले नाही. त्यांनी जरांगे यांच्या आरोपांना राजकीय रंग देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगून त्यांचा दावा खोटा असल्याचं स्पष्ट केलं. तथापी, धनंजय मुंडे यांनी जरांगे यांच्या आरोपांचा थेट प्रत्युत्तर दिलं. त्यांनी पत्रकारांना सांगितले की, जर काही ठोस पुरावे किंवा तारीख-जागा असतील तर त्या संदर्भात ते सामोरं येण्यास तयार आहेत. तुम्ही तारीख आणि ठिकाण सांगा, मी आणि माझे सर्व कार्यकर्ते समोर येऊ, असे आव्हान त्यांनी जरांगे यांना दिले. तसेच तुम्ही कोणाच्या प्रेरणेतून हिंसा करीत आहात? असा थेट सवालही धनंजय मुंडेंनी केला आहे.
हेही वाचा –धनंजय मुंडेंनी हत्येचा कट रचला; जरांगेच्या आरोपावर लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया
मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं की, त्यांच्या विरोधात हत्येचा कट रचण्यात आला असून त्यासाठी अडीच कोटींची सुपारी देण्यात आली होती. त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी आणि दोषी आढळल्यास कडक शिक्षा करण्याची मागणी केली. तसेच त्यांनी विरोधकांची नार्को टेस्ट व ब्रेन मॅपिंग करून सत्याचा शोध घ्यावा, अशी मागणी केली.
या घटनेनंतर स्थानिक पोलीस आणि राजकीय संघटनांवर दबाव वाढला आहे. ज्या स्वरूपाचे आरोप समोर आले आहेत त्याची गांभीर्याने चौकशी करणे आवश्यक असल्याचं मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलं आहे. तसेच धनंजय मुंडे यांनी मानहानीच्या बाबतीत कायदेशीर पावले उचलण्याचा इशारा दिला आहे.


