मुंबई : शेअर मार्केटमध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. त्यात गेल्या पाच दिवसांत दोन्ही शेअर बाजार निर्देशांकांमध्ये जोरदार वाढ झाली. आठवड्यात बीएसई सेन्सेक्स १.६२% वाढला, तर राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) मध्येही १.६४% वाढ झाली. देशातील १० सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी आठ कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल २.०५ लाख कोटींनी वाढले. या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना नफा झाला.
गेल्या आठवड्यात गुंतवणूकदारांना पैशांचा वर्षाव करणाऱ्या कंपन्यांच्या यादीत टेलिकॉम क्षेत्रातील दिग्गज भारती एअरटेल अव्वल स्थानावर आहे. भारती एअरटेलचे बाजार भांडवल ११.९६ लाख कोटींपेक्षा जास्त वाढले आणि त्यांच्या गुंतवणूकदारांनी पाच दिवसांत तब्बल ५५६५२ कोटी कमावले. मुकेश अंबानी रिलायन्स दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्यांचे बाजार भांडवल ५४९४१ कोटींनी वाढून २०.५५ लाख कोटींवर पोहोचले आहे. दोन्ही कंपन्यांमधील गुंतवणूकदारांनी पाच दिवसांत एकूण ११०५९३ कोटींची गुंतवणूक केली.
दरम्यान, देशातील १० सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी आठ कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल २.०५ लाख कोटींनी वाढले. या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना नफा झाला. आता याची माहिती समोर आली आहे. शेअर मार्केटच्या गेल्या पाच दिवसांत एकूण ११०५९३ कोटींची गुंतवणूक केल्याचे दिसून आले.


