पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, नाशिक महानगरपालिकेत रिक्त पदावर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
नाशिक महानगरपालिकेत सहाय्यक अभियंता (विद्युत), सहाय्यक अभियंता (स्थापत्य), सहाय्यक अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ अभियंता (विद्युत), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नाशिक येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत ११४ रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १ डिसेंबर २०२५ ही असणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही परीक्षा, मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. यात वयोमर्यादाही ठरवण्यात आली आहे.
यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.nmc.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता (वाहतुक), सहाय्यक कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), सहाय्यक कनिष्ठ अभियंता (विद्युत)
– रिक्त पदे : 114 पदे.
– नोकरीचे ठिकाण : नाशिक.
– अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग : १००० मागास प्रवर्ग 900 रुपये
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : १० नोव्हेंबर २०२५.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : १ डिसेंबर २०२५


