Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुण्यातील वकील असीम सरोदे यांना मोठा दिलासा! निलंबनाला BCI ची स्थगिती

पुण्यातील वकील असीम सरोदे यांना मोठा दिलासा! निलंबनाला BCI ची स्थगिती

Asim Sarode Suspension Stay: पुण्यातील प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांना मोठा दिलासा देणारा निर्णय बार कौन्सिल ऑफ इंडिया (BCI) ने मंगळवारी दिला. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने लादलेले तीन महिन्यांचे निलंबन BCI ने तात्पुरते स्थगित केले आहे. व्यावसायिक गैरवर्तनाच्या आरोपावरून लादलेला हा दंड मागे घेण्यात आला आहे. BCI च्या शिस्तपालन समितीने संबंधित कागदपत्रांचे परीक्षण केल्यानंतर सांगितले की, अपीलकर्त्याच्या (सरोदे यांच्या) बाजूने प्रथमदर्शनी मजबूत केस आहे. कोणत्याही दंडात्मक कारवाईपूर्वी तथ्यांची स्वतंत्र, सखोल चौकशी आवश्यक असून वकिलाचे वर्तन खरोखरच “व्यावसायिक गैरवर्तन” ठरते का, हे तपासल्याशिवाय कारवाई होणे आवश्यक आहे. त्यामुळे 12 ऑगस्ट 2025 च्या निलंबन आदेशाची अंमलबजावणी थांबवण्यात आली आहे.

वादाची पार्श्वभूमी

2024 मध्ये शिवसेनेच्या एका कार्यक्रमात केलेल्या विधानांवरून सरोदे यांनी माफी मागण्यास नकार दिला होता. राज्य बार कौन्सिलने त्यांच्यावर न्यायव्यवस्थेबद्दल “अविश्वास आणि अनादर” निर्माण केल्याचा आरोप केला होता. त्यांना 25,000 दंड आणि 3 महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले होते. यानंतर सरोदे यांनी तत्काळ अपील दाखल केले होते.

हेही वाचा – Parth Pawar land dispute : पुणे जमीन व्यवहार प्रकरणात पार्थ पवारांवर कोणताही आरोप नाही; समितीचा अहवाल समोर, तीन अधिकारी दोषी

सत्याचा विजय; सरोदे यांची प्रतिक्रिया

BCI चा निर्णय जाहीर झाल्यानंतर सरोदे यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, “शिस्तभंगाच्या प्रक्रियेत न्याय आणि निष्पक्षतेवर आधारित जबाबदारी आवश्यक आहे. शेवटी सत्याचा विजय झाला आहे.” सरोदे यांनी म्हटलं की, व्यावसायिक गैरवर्तनाची स्पष्ट व्याख्या नसल्याने त्याचा मनमानी अर्थ लावला जातो आणि त्याच विरोधात हा निर्णय महत्त्वाचा आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!