मुंबई : सध्या ‘बिग बॉस’च्या घरात अनेक घडामोडी घडत आहेत. त्यात फॅमिली वीकदरम्यान घरातील सदस्य भावनिक होताना दिसत आहे. अनेक महिने त्यांच्या कुटुंबापासून दूर राहिल्यानंतर, स्पर्धकांना अखेर त्यांच्या प्रियजनांना भेटण्याची संधी मिळाली. यामध्ये घरातील सदस्य भावनिक झाल्याचे दिसून आले.
जेव्हा गौरव खन्नाची पत्नी आकांक्षा चमोला घरात आली, तेव्हा वातावरण बदलले. घरातील सदस्य फ्रीज-अनफ्रीझचा खेळ खेळत होते, पण आकांक्षा आत येताच सूर बदलल्याचे दिसून आले. आत जाताना आकांक्षा म्हणाली, मी जास्त वेळ राहणार नाही. मला शूटला जायचे आहे. मग, सर्वांकडे हसत ती म्हणाली, सर्वजण छान दिसत आहेत. प्रणित, मला तुम्हाला हसवावे लागेल. मी फक्त पार्टीसाठी इथे आहे. त्यानंतर आकांक्षा तिचा नवरा गौरवकडे वळली आणि सर्वांना म्हणाली, ‘गौरव खूप निरागस आहे’.
आकांक्षा म्हणाली, “बिग बॉसने मला आणि माझ्या नवऱ्याने आमच्या १० वर्षांच्या लग्नात जितके घरकाम केले होते, त्यापेक्षा तीन महिन्यांत जास्त घरकाम करायला लावले. त्यानंतर, चांगलीच चर्चा सुरु झाली. आकांक्षा चमोली प्रणीतला म्हणाली, “गौरव अजिबात पार्टी करत नाही. तो वेगळाच माणूस आहे. तो नेहमीच काम करतो, म्हणून तो घरी येऊ इच्छितही नाही. हा माणूस कधीच घरी येत नाही. आमच्या नवीन लग्नानंतर, मी त्याची वाट पाहत असे. मात्र, तो सेटवर १८ तास शूटिंग करत असायचा.”


