मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक किस्से घडत आहेत. त्यातच अभिनेता अनिल कपूर यांची कन्या असलेल्या सोनम कपूर हिच्याबाबत एक बातमी समोर आली आहे. सोनम कपूर हिने तिच्या बाळाच्या आगमनाची घोषणा केली. वयाच्या ४० व्या वर्षी तिच्या दुसऱ्या बाळाचे स्वागत करत आहे, अशी घोषणा स्टाईलमध्ये करत आहे.
बॉलिवूड फॅशन आयकॉन सोनम कपूरने पुन्हा एकदा ‘गुड न्यूज’ दिली आहे. कपूर कुटुंबाला नवीन बाळ होणार आहे. सोनम कपूर ही पुन्हा गर्भवती झाली आहे. सर्व अटकळांना पूर्णविराम देत सोनमने जाहीर केले की ती आणि तिचा पती आनंद आहुजा त्यांच्या दुसऱ्या बाळाची वाट पाहत आहेत. हे माहिती होताच सोनम आणि तिच्या चाहत्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सोनमने यावेळी वेगळ्या पद्धतीने ही ‘गुड न्यूज’ दिली. तिने स्वतःचे काही स्टायलिश फोटो शेअर केले आणि ती पुन्हा गर्भवती असल्याचे उघड केले.
सोनमने फॉर्मल पण फॅशनेबल गुलाबी ड्रेस आणला आहे. याचे अनेक फोटो पोस्ट केले आहेत. सोनम पेन्सिल-कट स्कर्टसह ब्लेझर, मॅचिंग हँडबॅग आणि काळ्या शेड्ससह जोडताना दिसली. सोनमने तिच्या बेबी बंपवर हात ठेवून तिच्या गरोदरपणाची माहिती दिली. तिने कॅप्शनमध्ये फक्त ‘आई’ लिहिले आणि किसिंग इमोजी पेस्ट केला.


