Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

‘अरे कळत नाहीये का…?’ भरसभेत अजित पवारांचा चढला पारा; नेमकं काय घडलं?

‘अरे कळत नाहीये का…?’ भरसभेत अजित पवारांचा चढला पारा; नेमकं काय घडलं?

जालना: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथून आपल्या स्थानिक निवडणूक प्रचाराची औपचारिक सुरुवात केली असून, माळेगाव नगरपंचायतीतील सभेमध्ये त्यांनी स्पष्ट भाषेत भूमिका मांडत कार्यकर्त्यांनाच थेट इशारा दिला. “मी साधूसंत नाही. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून मत दिलं तर मी तुमचं काम करतो. पण तुम्हीच पाठ फिरवली, तर मीही गोड बोलणार नाही,” असे कडक शब्द अजित पवारांनी आपल्या भाषणात उच्चारले. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, विरोधकांनी त्यांच्यावर ‘दमदाटी करण्याचा’ आरोप सुरू केला आहे.

माळेगावच्या सभेत अजित पवार संतापले

माळेगावच्या सभेची चर्चा अजून सुरू असतानाच अजित पवार आज जालना जिल्ह्यातील परतूर येथे सभेला पोहोचले. मात्र, सभा सुरू होण्यापूर्वीच पुन्हा एकदा त्यांचा राग अनावर झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांसाठी बसायची व्यवस्था योग्य प्रकारे न झाल्याने त्यांनी थेट पोलिसांवर नाराजी व्यक्त केली. व्यासपीठावरून खाली उतरून माईक हातात घेत त्यांनी पोलिसांना फटकारले. ‘माझे उमेदवार कुठे बसणार? खुर्च्या पुढे लावा. मी सांगतोय काढा त्या खुर्च्या, घेऊन या इथे! कळत नाही का तुम्हाला?’ असा संताप त्यांनी पोलिसांसमोर व्यक्त केला. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – ऐन निवडणुकीत अजित पवार गटात धुसफूस; मुंडेंना ‘माझ्या मतदारसंघात पाठवू नका, ‘या’ आमदारच इशारा? काय आहे कारण?

दरम्यान, दोन्ही सभांमध्ये त्यांनी केलेल्या कठोर वक्तव्यांमुळे अजित पवार पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर ते राज्यभर दौरे करत आहेत आणि पक्षाच्या उमेदवारांना बळ देण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, सभांमधील त्यांच्या तडकाफडकी प्रतिक्रियांमुळे त्यांची शैली आणि भाष्य सतत वादाच्या भोवऱ्यात सापडत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!