नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात सातत्याने चढउतार पाहिला मिळत आहे. त्यात शनिवारी चांदीच्या किमतीत लक्षणीय घट दिसून आली. चांदीच्या किमती अचानक घसरल्याने सराफा बाजारातही घसरण झाली आहे. एमसीएक्सवरील घसरणीसोबतच, सराफा बाजारातही चांदीच्या किमतीत लक्षणीय घट दिसून आली आहे. एमसीएक्सवरील चांदीचा भाव प्रति किलो १५०८६८ वर व्यवहार करताना दिसला.
सोन्याच्या किमतीत थोडीशी वाढ दिसून येत आहे. एमसीएक्सवरील सोन्याच्या किमती १८० ने वाढून १२२९१० वर पोहोचल्या. सोन्याच्या किमती सुमारे ९०० ने घसरल्या होत्या. मात्र, आता त्यात काही प्रमाणात सुधारणा दिसून येत आहे. २४ कॅरेट सोन्याच्या किमती सकाळच्या किमतीच्या तुलनेत १००० ने वाढून १२१४६ प्रति १० ग्रॅमवर पोहोचल्या आहेत. २३ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १००० रुपयांनी वाढून १२२५३ रुपये झाली आहे. २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ११२८०२ रुपये झाली आणि १८ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९२३६० रुपये झाली आहे.
भारतीय सराफा बाजारात चांदीची किंमत थोडीशी घसरली आहे. शुक्रवारी सकाळच्या किमतीच्या तुलनेत, चांदीची किंमत प्रति किलो २५० रुपयांनी कमी झाली आहे, तर संध्याकाळच्या तुलनेत, किंमत प्रति किलो ३००० रुपयांनी कमी झाली आहे. ऑक्टोबरमध्ये, सोन्याने एमसीएक्सवर १.३२ लाख रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला. तेव्हापासून, सोन्याची किंमत १०००० रुपयांनी कमी झाली आहे.


