Dharmendra Death: हिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार आणि सर्वांच्या मनातील ‘ही-मॅन’ धर्मेंद्र यांनी काल वयाच्या ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते आणि प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना शनिवारी रात्री व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले. त्यांच्या जाण्याने बॉलिवूडसह संपूर्ण देशात मोठी शोककळा पसरली आहे. अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांनी श्रद्धांजली वाहत त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या.
राष्ट्रपती मुर्मू यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “धर्मेंद्रजींचे निधन हे भारतीय चित्रपटविश्वासाठी अपूरणीय नुकसान आहे. अनेक दशकांच्या प्रवासात त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अमिट छाप सोडणारी संस्मरणीय कामगिरी केली. त्यांचा कार्यकाळ आणि त्यांची ओळख पुढील पिढ्यांना सतत प्रेरणा देत राहील. त्यांच्या कुटुंबियांसह चाहत्यांप्रती माझ्या मन:पूर्वक संवेदना.”
The demise of veteran actor and former Member of Parliament Shri Dharmendra Ji is a great loss to Indian cinema. One of the most popular actors, he delivered numerous memorable performances during his decades-long illustrious career. As a towering figure of Indian cinema, he…
— President of India (@rashtrapatibhvn) November 24, 2025
एक सुवर्णकाळ संपला – पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान मोदी यांनी X वर अभिनेत्याप्रती आपली दुःखद भावना व्यक्त केली. त्यांनी लिहिले, “धर्मेंद्रजींच्या जाण्याने भारतीय सिनेमातील एक युगच संपले आहे. त्यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिकेत एक वेगळी ऊर्जा, खोली आणि आकर्षण होते. त्यांचा साधेपणा आणि नम्रता हेच त्यांची खरी ओळख होती. या दुःखद प्रसंगी मी त्यांच्या कुटुंबीयांसोबत आणि चाहत्यांसोबत आहे. ओम शांती.”
The passing of Dharmendra Ji marks the end of an era in Indian cinema. He was an iconic film personality, a phenomenal actor who brought charm and depth to every role he played. The manner in which he played diverse roles struck a chord with countless people. Dharmendra Ji was…
— Narendra Modi (@narendramodi) November 24, 2025
सहा दशकांचा तेजस्वी प्रवास संपला – अमित शाह
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी श्रद्धांजली अर्पण करताना म्हटले, “धर्मेंद्रजींचे निधन हे भारतीय चित्रपटसृष्टीसाठी कधीही भरून न येणारे नुकसान आहे. एका साध्या कुटुंबातून आलेल्या या कलाकाराने सहा दशके प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतला. प्रत्येक पात्राला त्यांनी जिवंत केले आणि सर्व वयोगटांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवली. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.” धर्मेंद्र यांचा निधनाने फक्त एक दिग्गज कलाकारच नाही, तर पिढ्यानुपिढ्यांना प्रेरणा देणारी एक महान व्यक्ती सर्वांपासून दूर गेली आहे.


