Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

लग्न थांबल्यानंतर स्मृतीने इन्स्टावर पलाशला केलं अनफॉलो, लग्नाचे फोटो-व्हिडीओ केले डिलीट

लग्न थांबल्यानंतर स्मृतीने इन्स्टावर पलाशला केलं अनफॉलो, लग्नाचे फोटो-व्हिडीओ केले डिलीट

Smriti-Palash Wedding Cancelled: भारतीय महिला क्रिकेटमधील स्टार ओपनर स्मृती मंधाना आणि म्युझिक डायरेक्टर–फिल्ममेकर पलाश मुच्छल यांच्या लग्नाबाबत चर्चा सुरू होत्या. 23 नोव्हेंबरला दोघे विवाहबंधनात अडकणार होते. पण स्मृतीच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडल्याने हे लग्न अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले. पण आता त्यांच्या नात्याबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पलाश मुच्छलच्या इन्स्टाग्राम चॅटमुळे खळबळ

सोशल मीडियावर अचानक काही स्क्रीनशॉट्स व्हायरल झाले आहेत. दावा केला जात आहे की हे स्क्रीनशॉट्स पलाश मुच्छल याच्या इन्स्टाग्राम चॅटचे आहेत. पुढारी न्यूजचे अधिकृत स्रोत याची खात्री देत नाहीत, मात्र इंटरनेटवर या स्क्रीनशॉट्समुळे मोठं वादळ उठलं आहे.

हे स्क्रीनशॉट्स एका महिलेने ‘मेरी डी कोस्टा’ या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केले. त्यात पलाश तिची खूप स्तुती करताना, तिला स्विमिंग, स्पा सेशन आणि मुंबईच्या वर्सोवा बीचवर पहाटे 5 वाजता भेटायला बोलावताना दिसत असल्याच दिसत आहे. जेव्हा मेरीने त्यांना स्मृतीसोबतच्या नात्याबाबत प्रश्न केला, तेव्हा पलाशने विषय टाळल्याचं स्क्रीनशॉट्समध्ये म्हटलं जात आहे.

या पोस्टनंतर पलाशवर टीकेचा भडिमार सुरू झाला आहे. अनेक युजर्सने स्मृतीसाठी सहानुभूती व्यक्त करताना लग्न स्थगित होण्यामागे “खरंच काहीतरी वेगळं कारण आहे का?” असा प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे.

इंस्टाग्रामवरून फोटो डिलीट

लग्न स्थगित झाल्यानंतर स्मृती मंधानाने अचानक लग्नाचे सर्व फोटो इंस्टाग्रामवरून डिलीट केले. चाहत्यांना हा निर्णय धक्का देणारा वाटला. तिच्या बाजूनं अद्याप कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही.

पलक मुच्छल काय म्हणाली?

दरम्यान, पलाश मुच्छल याची बहीण पलक मुच्छल हिने इंस्टाग्रामवर लिहून स्पष्ट केलं की,
“लग्न फक्त स्मृतीच्या वडिलांच्या तब्येतीमुळे पुढे ढकलले आहे. कृपया आमच्या प्रायव्हसीचा आदर करा.”

मात्र सोशल मीडियावर वाढलेला वाद आणि व्हायरल चॅट्स यामुळे चर्चेला आणखी उधाण आलं आहे. सध्या या साऱ्याबद्दल अधिकृत खुलासा ना स्मृतीच्या बाजूने आला आहे, ना पलाशच्या. त्यामुळे चाहत्यांच्या मनात प्रश्न कायम आहेत, लग्न खरंच फक्त तब्येतीमुळे पुढे ढकललं, की नात्यात खरोखर काहीतरी बिनसलं आहे?

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!