मुंबई : सध्या शेअर मार्केटमध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. त्यातच बुधवारी शेअरची किंमत ५० टक्के घसरली. असा एक शेअर जो ५३४० रुपयांवरून घसरून २६८२ रुपयांवर आला. एचडीएफसी अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड (एचडीएफसी एएमसी) च्या शेअर्समध्ये हा बदल झाला. मंगळवारी एनएसईवर हा शेअर ५३३९.५० रुपयांवर बंद झाला. मात्र, बुधवारी प्रति शेअर २६८२ रुपयांवर उघडला, म्हणजे ४९.७४ टक्क्यांनी घसरला.
असे जरी असले तरी प्रत्यक्षात हा शेअर ५० टक्क्यांनी घसरला नाही, तर १:१ च्या प्रमाणात एक्स-बोनसचा व्यवहार झाला आहे. वन-फॉर-वन बोनसनंतर, गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओमधील एचडीएफसी एएमसीचे शेअर्स आता दुप्पट होती. गुंतवलेल्या रकमेत कोणताही बदल झाला नसल्याचे समोर आले आहे. बोनस इश्यूमुळे शेअरहोल्डर्सना गुंतवलेल्या रकमेतून मोफत शेअर्स मिळतात, दर्शनी मूल्यात कोणताही बदल न होता हे दिसत आहे.
काही ट्रेडिंग अॅप्सवर ही ५० टक्के घसरण दिसून येईल, परंतु गुंतवणूकदारांना घाबरून जाण्याची गरज नाही. ही घसरण केवळ वरवरची आहे, कारण नवीन शेअर्स जारी केल्यावर शेअर्सची संख्या दुप्पट होते. इक्विटीमध्ये कोणतीही कपात झालेली नाही. दर्शनी मूल्य तेच राहते.
शेअर्सची संख्या वाढते
एक्स-बोनस इश्यूनंतर एचडीएफसी एएमसीचे शेअर्स सुरुवातीच्या किमतीत ०.५१ टक्क्यांनी जास्त ट्रेडिंग करत होते. बोनस इश्यूनंतर जारी केलेल्या शेअर्सची संख्या वाढते, फ्री रिझर्व्ह फंड कमी होतो आणि प्रति शेअर कमाई (ईपीएस) कमी होते.


