मुंबई : कॉमेडियन कपिल शर्मा हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण, कपिल हा पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर आपले नशीब आजमावण्यास सज्ज झाला आहे. त्याच्या बहुप्रतिक्षित ‘किस किसको प्यार करूं २’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. तो खूपच मनोरंजक आहे आणि चाहत्यांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
कपिल शर्मा चित्रपटात तीन अभिनेत्रींसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. ट्रेलरमध्ये प्रेम मिळवण्याची त्याची इच्छा स्पष्टपणे दिसून येते, ज्यासाठी त्याने हिंदू धर्मातून इस्लाम आणि इस्लाममधून ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे. मात्र, त्याचे प्रेम अजूनही त्याच्यापासून दूर राहिल्याचे दिसून आले. यात त्याला निश्चितच तीन महिला सापडल्या. चित्रपटाचा प्रीव्ह्यू खूपच मनोरंजक आहे, तसेच त्याचा कॉमिक टाइमिंग देखील आहे. हा ट्रेलर पाहिल्यानंतर याचीच चर्चा सुरु झाली आहे.
दरम्यान, या चित्रपटात कपिलसोबत आयेशा खान, त्रिधा चौधरी, पारुल गुलाटी आणि हिरा वारिना यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. अनुकुल गोस्वामी दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती अब्बास-मस्तान यांनी केली आहे. हा चित्रपट १२ डिसेंबर रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
कपिलच्या बॉक्स ऑफिसवरील अपेक्षा
बॉक्स ऑफिसवरील कमाई कमी होत असताना कपिलला त्याच्या चित्रपटाच्या क्षमतेबद्दल विचारले असता त्याने किस किसको प्यार करूंपूर्वी, मला बॉक्स ऑफिस काय आहे हे माहित नव्हते. लहानपणी आम्ही चित्रपट पाहत होतो तेव्हाही आम्हाला कल्पना नव्हती. फक्त चित्रपट पाहणे हेच माहिती होते. मात्र, आता याची माहिती होताना दिसत आहे.


