पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, लातूरच्या विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. तरी यात मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय लातूर येथे सहायक प्राध्यापक (न्यायवैद्यकशास्त्र, जनऔषधवैद्यकशास्त्र, औषधशास्त्र) या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला लातूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत पाच रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १ डिसेंबर २०२५ ही असणार आहे.
संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. यात वयोमर्यादाही ठरवण्यात आली आहे. यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
१ डिसेंबर २०२५ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असल्याने इच्छुक उमेदवारांनी लवकर अर्ज करण्याचा सल्ला दिला जात आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी
http://www.gmclatur.org/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


