Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

शेअर मार्केटमध्ये चढउतार कायम; ‘हा’ शेअर अचानक 50 टक्क्यांनी घसरला, कारण काय तर…

शेअर मार्केटमध्ये चढउतार कायम; ‘हा’ शेअर अचानक 50 टक्क्यांनी घसरला, कारण काय तर…

मुंबई : सध्या शेअर मार्केटमध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. त्यातच बुधवारी शेअरची किंमत ५० टक्के घसरली. असा एक शेअर जो ५३४० रुपयांवरून घसरून २६८२ रुपयांवर आला. एचडीएफसी अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड (एचडीएफसी एएमसी) च्या शेअर्समध्ये हा बदल झाला. मंगळवारी एनएसईवर हा शेअर ५३३९.५० रुपयांवर बंद झाला. मात्र, बुधवारी प्रति शेअर २६८२ रुपयांवर उघडला, म्हणजे ४९.७४ टक्क्यांनी घसरला.

असे जरी असले तरी प्रत्यक्षात हा शेअर ५० टक्क्यांनी घसरला नाही, तर १:१ च्या प्रमाणात एक्स-बोनसचा व्यवहार झाला आहे. वन-फॉर-वन बोनसनंतर, गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओमधील एचडीएफसी एएमसीचे शेअर्स आता दुप्पट होती. गुंतवलेल्या रकमेत कोणताही बदल झाला नसल्याचे समोर आले आहे. बोनस इश्यूमुळे शेअरहोल्डर्सना गुंतवलेल्या रकमेतून मोफत शेअर्स मिळतात, दर्शनी मूल्यात कोणताही बदल न होता हे दिसत आहे.

काही ट्रेडिंग अ‍ॅप्सवर ही ५० टक्के घसरण दिसून येईल, परंतु गुंतवणूकदारांना घाबरून जाण्याची गरज नाही. ही घसरण केवळ वरवरची आहे, कारण नवीन शेअर्स जारी केल्यावर शेअर्सची संख्या दुप्पट होते. इक्विटीमध्ये कोणतीही कपात झालेली नाही. दर्शनी मूल्य तेच राहते.

शेअर्सची संख्या वाढते

एक्स-बोनस इश्यूनंतर एचडीएफसी एएमसीचे शेअर्स सुरुवातीच्या किमतीत ०.५१ टक्क्यांनी जास्त ट्रेडिंग करत होते. बोनस इश्यूनंतर जारी केलेल्या शेअर्सची संख्या वाढते, फ्री रिझर्व्ह फंड कमी होतो आणि प्रति शेअर कमाई (ईपीएस) कमी होते.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!