Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Shahajibapu Patil : “राजकारण सोडण्याचा विचार करतोय”; धाडीनंतर शहाजीबापू पाटील यांची भावुक प्रतिक्रिया

Shahajibapu Patil : “राजकारण सोडण्याचा विचार करतोय”; धाडीनंतर शहाजीबापू पाटील यांची भावुक प्रतिक्रिया

सोलापूर : माढा मतदारसंघातील शिंदे गटाचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या सांगोला येथील कार्यालयावर सोमवारी निवडणूक आयोगाच्या पथकाने छापा टाकला. त्यांच्या निकटवर्तीयांच्या ठिकाणीही धाडी पडल्या. या कारवाईनंतर शहाजीबापू पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट राजकारण सोडण्याचा मनातील विचार उघड केला आहे.

ते म्हणाले, “हे सगळं चुकीच्या दिशेने राजकारण सुरू आहे. आज मनात राजकारण सोडून देण्याचा विचार येतोय. मी वरिष्ठ नेत्यांशी बोलून थांबण्याचा निर्णय घेईन. मी अनेक निवडणुका लढलो, पण सांगोल्याच्या राजकारणात अशी पद्धत कधीच नव्हती. सांगोल्याच्या स्वाभिमानी जनतेने हे सगळं पाहावं.” असं शहाजीबापू पाटील म्हणाले.

भाजप नेत्यांवर थेट आरोप

शहाजीबापू पाटील यांनी ही धाड सांगोल्याचे माजी आमदार दीपक साळुंखे यांनी पालकमंत्री तथा भाजप नेते जयकुमार गोरे यांच्यासोबत मिळून घडवल्याचा गंभीर आरोप केला.

भाजपकडून स्टंटबाजीचा आरोप

दरम्यान, भाजप नेते तथा आमदार बाबासाहेब देशमुख यांनी शहाजीबापूंच्या विधानाला “पराभवाची भीती असल्याने केलेली स्टंटबाजी” असं म्हटलं आहे. ते म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाल्यानंतर शहाजीबापूंना पराभव दिसू लागलाय. म्हणूनच ते पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करत आहेत. ही फक्त सहानुभूती मिळवण्याची स्टंटबाजी आहे.”

सोलापूर जिल्ह्यातील नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांच्या तोंडावर महायुतीतच निर्माण झालेल्या या अंतर्वादाने राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. शहाजीबापू पाटील हे शिंदे गटाचे तगडे नेते मानले जातात. त्यामुळे त्यांच्या “राजकारण सोडण्याच्या” घोषणेमुळे शिंदे गट आणि भाजप यांच्यातील दरी अधिकच रुंद होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!