Samantha Ruth Prabhu Marriage: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील नामांकित अभिनेत्री समांथा रूथ प्रभू पुन्हा एकदा वैवाहिक बंधनात अडकली आहे. अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चा, अफवा आणि अंदाजांना अखेर पूर्णविराम मिळवून, अभिनेत्रीने “द फॅमिली मॅन” चे सह-निर्माते राज निदिमोरू यांच्यासोबत लग्न केल्याची अधिकृत घोषणा केली आहे. दोघांनी सोशल मीडियावर त्यांच्या विवाहसोहळ्याचे मनमोहक फोटो शेअर केल्यानंतर चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे.
कोठे झाला लग्न समारंभ?
शनिवारी अत्यंत शांत, अध्यात्मिक आणि निवडक पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला. कोइंबतूरमधील ईशा योग केंद्रात दोघांनी नवीन आयुष्याची सुरुवात केली. समंथाने लग्नाचे फोटो शेअर करत चाहत्यांना याबाबत माहिती दिली.
हेही वाचा – दीपिका पदुकोणच्या धाकट्या बहिणीचं ठरलं लग्न; देओल कुटुंबासोबत होणार जवळचा संबंध
समंथाचा राजेशाही ब्राइडल अंदाज
समंथाने लाल रंगाची जरीभरतकाम असलेली रेशमी साडी परिधान केली होती. पारंपरिक सोन्याचे दागिने आणि साधा लूक, तिच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळीच शोभा देत होता. राज निदिमोरू देखील पांढरा कुर्ता-पायजमा आणि बेज नेहरू जॅकेटमध्ये आकर्षक दिसत होते. विधीपूर्व समारंभात दोघांनी अंगठ्या घातल्या.
View this post on Instagram
प्रेमकथा केव्हा सुरू झाली?
२०२४ मध्येच दोघांच्या नात्याची कुजबुज सुरू झाली होती. इंस्टाग्रामवरील संवाद, एकत्रित फोटो, वारंवार दिसणारी केमिस्ट्री सगळ्या गोष्टी वेगळेच संकेत देत होत्या. मात्र दोघांनीही एक शब्दही उच्चारला नव्हता. आणि आता, थेट विवाहाची घोषणा करत दोघांनी सर्व अटकळींवर शिक्कामोर्तब केले आहे.


