Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

संतोष बांगर यांच्या अडचणी वाढल्या! मतदानाच्या गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

संतोष बांगर यांच्या अडचणी वाढल्या! मतदानाच्या गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Case Registered Against Santosh Bangar : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी चालू असलेल्या मतदानादरम्यान हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे मोठी खळबळ उडाली. शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर मतदान केंद्रातच वादाच्या भोवऱ्यात सापडले असून, मतदानाच्या गोपनीयतेचा भंग आणि आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळवारी बाजार परिसरातील मतदान केंद्र क्रमांक 3 येथे सकाळी आमदार बांगर मतदानासाठी पोहोचले. त्यावेळी तेथील एका महिला मतदाराला ईव्हीएमवर कोणते बटण दाबायचे याबाबत त्यांनी मार्गदर्शन केल्याचे दिसते. याचदरम्यान मतदान केंद्राच्या आत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो तसेच एकनाथ शिंदे आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं अशा घोषणा दिल्या गेल्याचेही व्हिडिओमध्ये आढळते. केंद्राच्या आत मोबाइल फोनचा वापर केल्याचाही आरोप आहे.

हेही वाचा –संतोष बांगर यांच्याकडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग; नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर वृत्त

नियमांनुसार मतदान केंद्रात घोषणा देणे, मतदाराला सूचना करणे अथवा मोबाइल वापरणे हे सर्वच प्रकार थेट गोपनीयतेचा भंग मानले जातात. त्यामुळे या व्हिडिओनंतर संतोष बांगरांविरुद्ध कारवाईची मागणी जोर धरू लागली. व्हिडिओ समोर आल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले होते. अहवाल मिळाल्यानंतर हिंगोली शहर पोलिसांनी आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा नोंदवला असून, ही कारवाई त्यांच्यासाठी मोठा धक्का मानली जात आहे.

दरम्यान, या प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली. “लोकप्रतिनिधींनी लोकशाही प्रक्रियेला मान देणे ही मूलभूत अपेक्षा आहे. निवडणुकीच्या दिवशी आपण दिलेली वागणूक समाजात कोणता संदेश देईल याचा विचार करावा, अशा शब्दांत फडणवीस यांनी बांगर यांना फटकारले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!