मुंबई : बिग बॉस १९ चा शेवटचा आठवडा सुरू आहे. शोचा ग्रँड फिनाले ७ डिसेंबर रोजी होणार आहे. फिनालेपूर्वी, मीडियाने घरात प्रवेश केला आणि सर्व टॉप सहा स्पर्धकांना प्रश्न विचारले. तान्या मित्तल आणि फरहाना भट्ट यांना मीडियाने सर्वाधिक लक्ष्य केल्याचे दिसून आले. असे जरी असले तरी वैयक्तिक प्रश्न विचारल्यावर गौरव खन्ना देखील भावूक झाला.
‘बिग बॉस’शो चा एक नवीन प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये मीडिया फरहाना भट्टला चिडवताना दिसत आहे. फरहानाला विचारण्यात आले, “तुम्ही इतरांवर खालच्या पातळीवर टीका का करता? तुमच्या लेव्हलवर पोहोचण्यासाठी तुम्हाला किती पैसे असायला हवेत? त्यावर फरहानाने सांगितले, की ‘जर कोणी माझा सामना केला तर मी त्यांच्या लेव्हलला जाते’. माध्यमांनी प्रणित मोरेला त्याचा मित्र अभिषेक याला शोमधून बाहेर काढण्याबद्दलही प्रश्न विचारला. प्रणितने त्याच्या बचावात म्हटले की, शोमधील प्रत्येकाचे प्राधान्यक्रम बदलत राहतात.
दरम्यान, मीडिया देखील तान्या मित्तलवर संतापल्याचे दिसून आले. शोमध्ये खोट्या कथा रचल्याबद्दल तान्याला प्रश्नांना तोंड द्यावे लागले. महिला स्पर्धकांबद्दल अश्लील टिप्पण्या केल्याबद्दल तिला अनेक प्रश्न विचारण्यात आले, ज्यामुळे ती नंतर भावूक झाली. आता याचीच चर्चा सध्या बिग बॉसच्या घरात सुरु आहे.


