Harit Setu Protest: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्राधिकरण, निगडी परिसरात हरित सेतू प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्या प्रकल्पाच्या विरोधात प्राधिकरण, निगडी, आकुर्डी परिसरातील नागरिक रस्त्यावर उतरले. त्यांनी हुतात्मा चौकात रास्ता रोको करत प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली. यावेळी नागरिकांनी सह्यांची मोहिमही राबवून आपला तीव्र निषेध नोंदवला.
वाहतूक कोंडीची भीती
य़ा प्रकल्पामुळे अनेक वर्षांपासून वाढलेले देशी झाडे तोडण्यात येणार आहेत. त्यामुळे पर्यावरणाची हानी होईल. सर्व रस्ते अरुंद करून पदपथ मोठे केले जात आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन अनेक समस्या निर्माण होत आहेत. अपघाताचे प्रमाण वाढणार आहे. प्रकल्प व्हावा अशी कोणाचीही मागणी नाही, तरी देखील कोट्यवधी रुपयांचा खर्च प्रकल्पावर केला जात आहे. नागरिकांच्या गरजा, वाहतुकीची सध्याची परिस्थिती, परिसराची रचना याचा विचार केला नाही. जबरदस्तीने प्रकल्प नागरिकांच्या मार्थी मारणे बंद करावे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हा प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करावा. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निगडी प्राधिकरण रेसिडेन्ट फोरम फाउंडेशनने दिला आहे.
हेही वाचा – बनावट गुटख्याचा कारखाना उद्ध्वस्त! 1 कोटींचा मुद्देमाल जप्त; पुणे पोलिसांची धडक कारवाई
आंदोलनात माजी महापौर आर. एस. कुमार, माजी उपमहापौर शैलजा मोरे, माजी नगरसेवक राजू मिसाळ, अमित गावडे, शर्मिला बाबर तसेच, नीलेश शिंदे, अतुल भोंडवे, अर्जुन दलाल, प्रतिभा जोशी, सूर्यकांत मुथीयान, चंद्रकांत कोठारी,अश्विन खरे, अविनाश मोरे, राजेंद्र बाबर, रवी हिंगे, अमोल निकम, बाळा दानवले, समीर जावळकर, विलास कुटे, आकाश शेट्टी, अनुप मोरे, भारती फरांदे, धनंजय काळभोर, आप्पा बागल, आबा ताकवणे, योगेश बाबर, विजय शिणकर, वैभवी घोडके, श्रीमंत जगताप, बाळा शिंदे, रामभाऊ पांढरकर, अतुल इनामदार, आनंदराव मुलुक आणि नागरिकांनी सहभाग घेतला.


