RBI Repo Rate: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) शुक्रवारी लाखो कर्जदारांना दिलासा देणारा मोठा निर्णय जाहीर केला. वाढत्या खर्चासोबत ईएमआय कमी होण्याची अपेक्षा करणाऱ्या ग्राहकांना आरबीआयच्या ताज्या धोरणाचा थेट फायदा होणार आहे. चलनविषयक धोरण समितीच्या (एमपीसी) तीन दिवसांच्या बैठकीनंतर, आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रेपो दरात ०.२५ टक्के कपात जाहीर करत तो ५.२५ टकक्यांवर आणल्याचे सांगितले.
आर्थिक परिस्थितीचा सखोल आढावा
दरम्यान, ३ ते ५ डिसेंबरदरम्यान झालेल्या बैठकीत देशांतर्गत महागाई, जागतिक आर्थिक घडामोडी, मागणीची स्थिती आणि महागाईतील सततची घट या सर्व घटकांचा विचार करण्यात आला. सर्व सदस्यांनी एकमताने रेपो दर कमी करण्यास मान्यता दिली. भारताची अर्थव्यवस्था सध्या मजबूत स्थितीत आहे. दुसऱ्या तिमाहीत जीडीपी ८.२ टक्यांनी वाढला, तर ऑक्टोबर २०२५ मध्ये किरकोळ महागाई ०.२५ टक्के इतक्या ऐतिहासिक नीचांकावर होती. या सकारात्मक आकडेवारीमुळे आरबीआयला व्याजदर कपातीची मोकळीक मिळाली.
हेही वाचा – कोरोना IPO येतोय; पुढच्या आठवड्यात होणार लाँच, मार्केटमध्ये एकच चर्चा
कर्जदारांना लाभ, ईएमआयमध्ये घट
रेपो दर कमी झाल्यामुळे बँका आरबीआयकडून स्वस्तात कर्ज घेऊ शकतील. त्याचा थेट परिणाम पुढीलप्रमाणे दिसेल:
- गृहकर्जाच्या ईएमआयमध्ये घट
- वाहन कर्जे स्वस्त
- वैयक्तिक कर्जांवरील व्याजदरातही सवलतीची शक्यता
या निर्णयामुळे सणांनंतर ग्राहकांच्या खर्चावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो आणि त्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळू शकतो.
हेही वाचा – शेअर मार्केटमध्ये चढउतार कायम; ‘या’ स्टॉकच्या किमतीत झाली मोठी घसरण
तटस्थ भूमिका कायम
एमपीसीने आपल्या धोरणामध्ये तटस्थ भूमिका कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ महागाई नियंत्रण आणि आर्थिक वाढ यांच्यात संतुलन राखणे हे आरबीआयचे प्रमुख उद्दिष्ट असेल.


