Today बुधवार, 28th ऑक्टोबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Solapur Crime: डॉ. शिरीष वळसंगकर प्रकरणात नवा ट्विस्ट! मनिषा मुसळेंच्या वकिलाचा कोर्टात खळबळजनक दावा

Solapur Crime: डॉ. शिरीष वळसंगकर प्रकरणात नवा ट्विस्ट! मनिषा मुसळेंच्या वकिलाचा कोर्टात खळबळजनक दावा

Solapur Crime: राज्यभर चर्चेत आलेल्या न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येच्या तपासात नवी माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या नोंदीनुसार 18 एप्रिलच्या रात्री सुमारे 8.40 वाजता त्यांनी आत्महत्या केली. मात्र, त्याआधी काही तासांत त्यांना हॉस्पिटलमधील एका महिला कर्मचाऱ्याचे सलग तीन महत्त्वाचे फोन कॉल आले असल्याचा दावा आरोपीची बाजू मांडणारे वकील अ‍ॅड. प्रशांत नवगिरे यांनी न्यायालयात केला.

आत्महत्येच्या दोन दिवस आधी ‘वेगळ्या’ कॉलची मालिका

डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणात संशयित म्हणून अटक झालेल्या मनीषा मुसळे माने यांचे वकील अ‍ॅड. नवगिरे यांनी सांगितले की, आत्महत्येच्या दोन दिवस आधी म्हणजेच 16 व 17 एप्रिलला पी. राऊत नावाच्या महिला कर्मचाऱ्याने डॉक्टरांना वारंवार फोन केला होता. ही पी. राऊत वळसंगकर हॉस्पिटलमध्ये काम करतात आणि प्रकरणातील साक्षीदार आहे. नवगिरे यांच्या मते, गेल्या काही महिन्यांतील कॉलचा तपशील तपासल्यास या प्रकरणातील धागेदोरे अधिक स्पष्ट होतील. डिसेंबर 2024 ते 1 मे 2025 या कालावधीत डॉ. वळसंगकर, पी. राऊत आणि आर. राऊत यांचे कॉल डिटेल रेकॉर्ड्स आणि टॉवर लोकेशन्स तपासावेत, अशी मागणीही यावेळी वकिलांनी केली.

हेही वाचा – Satara Doctor Case: फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाबाबत मोठी अपडेट! हातावरची नोट कुणी लिहिली? फडणवीसांनी अधिवेशनात केला मोठा खुलासा

आत्महत्येच्या थोड्याच आधीचे शेवटचे फोन कॉल

दरम्यान, या महिलेशी वळसंगकर यांनी काय संवाद साधला? या कॉल्सची गरज काय होती, असा ठोस प्रश्न नवगिरे यांनी न्यायालयात उपस्थित केला. 18 एप्रिलच्या रात्री आत्महत्येच्या आधी डॉक्टरांना प्रथम तीन कॉल त्याच महिला कर्मचाऱ्यांकडून आले आणि नंतर त्यांचा मुलगा डॉ. अश्विन यांचा कॉल आला, असे वकिलांनी सांगितले. यानंतर काही मिनिटांतच आत्महत्येची घटना घडली.

चार महिन्यांचे सीडीआर तपासा

अ‍ॅड. नवगिरे यांनी न्यायालयात सांगितले की, या प्रकरणात राऊत आडनावाच्या दोन महिलांचा नेमका संबंध काय आहे हे स्पष्ट करणे आवश्यक आहे. त्यामुळे चार महिन्यांचे कॉल डिटेल्स तपासणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. सरकारतर्फे या प्रकरणातील बाजू अ‍ॅड. प्रदीपसिंग राजपूत यांनी मांडली. पुढील सुनावणींमध्ये आणखी कोणती माहिती पुढे येते, हे याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!