Today सोमवार, 27th जुलै 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Satara Doctor Case: फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाबाबत मोठी अपडेट! हातावरची नोट कुणी लिहिली? फडणवीसांनी अधिवेशनात केला मोठा खुलासा

Satara Doctor Case: फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाबाबत मोठी अपडेट! हातावरची नोट कुणी लिहिली? फडणवीसांनी अधिवेशनात केला मोठा खुलासा

Satara Doctor Case : फलटणमधील महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणाने राज्यभरात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेत आज महत्त्वपूर्ण चर्चा झाली. विरोधकांनी सातत्याने उपस्थित केलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर उत्तर दिलं. विजय वडेट्टीवार यांनी महिलेला एका विशिष्ट ड्युटीवरच वारंवार पाठवले जात होते का? तिच्यावर दबाव आणला जात होता का? आणि या सर्व घटकांची पडताळणी झाली आहे का? असे मुद्दे उपस्थित केले. त्यानंतर काँग्रेसच्या ज्योती गायकवाड यांनी आरोपींवर मकोका लावणार का? आणि महिला कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा उपाययोजना केव्हा उभारल्या जातील? अशी मागणी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या सर्व प्रश्नांना उत्तर देताना संपूर्ण तपास प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने केल्याचा दावा केला.

तरुणीच्या हातावर सुसाईड नोट कोणी लिहिली?

फडणवीस म्हणाले की, मृत डॉक्टर ११ महिन्यांच्या करारावर काम करत होत्या आणि फॉरेन्सिक तपासणीत तिच्याच हस्ताक्षरातील सुसाईड नोट असल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपी बदनेने लग्नाचे आमिष दाखवून तिची फसवणूक केली आणि शारीरिक शोषण केले, अशी माहितीही त्यांनी सभागृहात दिली. शोषणानंतर आरोपीने वागणुकीत बदल केला आणि याच मानसिक तणावामुळे महिलेने टोकाचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

हेही वाचा – फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण; पोलीस उपनिरीक्षक आरोपी गोपाळ बदने पोलीस खात्यातून बडतर्फ

सर्व संबंधितांची चौकशी

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, प्रकरणात ज्या नावांचा उल्लेख झाला, त्या सर्वांची चौकशी झाली आहे. या घटनेला राजकीय रूप देण्याचा काहींचा प्रयत्न होता, मात्र तपास यंत्रणांनी कोणत्याही दबावाखाली न येता आवश्यक पुरावे गोळा केले आहेत. हॉटेलपर्यंत महिलेची संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज आणि फॉरेन्सिक मटेरियल पोलिसांकडे उपलब्ध असल्याची माहितीही त्यांनी दिली.

हेही वाचा –Phaltan Doctor Death Case: फलटण डॉक्टर मृत्यू प्रकरणात अंधारेंकडून महत्त्वाचा पॉईंट समोर; वेलांटी, हस्ताक्षर काहीच जुळेना

कुटुंबीयांना मदतीचे आश्वासन

तपासात दुसऱ्या एका व्यक्तीनेही तिचे शोषण केल्याचे निष्पन्न झाले असून, त्यामुळे आत्महत्येचा मार्ग तिने अवलंबल्याचे फडणवीसांनी सांगितले. या प्रकरणात आत्महत्येशिवाय इतर कोणताही दृष्टीकोन नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी मृत डॉक्टरच्या कुटुंबीयातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्याची मागणी केली. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पीडित कुटुंबाला शासनाकडून शक्य ती सर्व मदत दिली जाईल, असे आश्वासन दिले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!